ठाणे जिल्ह्यात १७,९९४ महिला बचत गट सक्रिय; २६८ कोटींचे कर्जवाटप

    15-Oct-2026
 
Thane women self-help groups
 
ठाणे, : (Thane women self-help groups)महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून ठाणे जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाला चालना मिळत असून, जिल्ह्यातील १७ हजार ९९४ महिला बचत गटांशी २ लाख १३ हजार ६४५ महिला जोडल्या गेल्या आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात बचत गटांना २६८ कोटी २० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, निर्धारित उद्दिष्टाच्या १०५ टक्के पूर्तता झाली आहे.
 
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय तेजस्विनी सल्लागार समितीच्या बैठकीत माविमच्या कामांचा आढावा घेण्यात आला. शहापूर, भिवंडी आणि मुरबाड या ग्रामीण तालुक्यांसह जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रांत माविमचे काम सुरू आहे.(Thane women self-help groups)
 
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी वस्त्रनिर्मिती, पापड उद्योग, डाळ मिल, वारली कलाकृती आणि शेतमाल खरेदी-विक्री अशा ४२ उपप्रकल्पांची पूर्तता करण्यात आली आहे. याशिवाय, ७५ हिमोग्लोबिन तपासणी शिबिरे, ५० पोषण शिबिरे आणि सेंद्रिय शेतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.(Thane women self-help groups)
 
महिलांना मालमत्तेत हक्क मिळवून देण्याच्या उपक्रमांतर्गत २ हजार ५५० महिलांची नावे सातबारा आणि ८-अ उताऱ्यांवर नोंदविण्यात आली. जिल्ह्यातील महिला बचत गटांचे आर्थिक बळकटीकरण, आरोग्य, उद्योजकता आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला.(Thane women self-help groups)
 




संबंधित मजकूर