ठाण्यात ६,१९२ झाडांभोवतीचे काँक्रीट हटवणार; ४४.७३ लाखांचा प्रस्ताव

निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेची कार्यवाही; धोकादायक वृक्षांच्या तपासणीचाही मुद्दा ऐरणीवरThane tree concrete removal

    15-Oct-2026



Thane tree concrete removal

 
ठाणे, : (Thane tree concrete removal)शहराच्या विकासासाठी रस्ते आणि पदपथांचे काँक्रीटीकरण करताना झाडांच्या बुंध्यांभोवतीही सिमेंटचे जाळे उभे राहिले. आता या कोंडमाऱ्यातून ६,१९२ झाडांची सुटका करण्यासाठी ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. नऊ प्रभाग समित्यांमधील झाडांच्या बुंध्यांभोवतीचे काँक्रीट हटविण्यासाठी ४४ लाख ७३ हजार २७ रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर ही कार्यवाही पुढे सरकली असली, तरी झाडांना प्रत्यक्ष मोकळा श्वास कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे.(Thane tree concrete removal)
 
रस्ते आणि पदपथांच्या काँक्रीटीकरणात अनेक ठिकाणी झाडांच्या खोडांपर्यंत सिमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास आणि मुळांपर्यंत हवा पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. झाडांच्या नैसर्गिक वाढीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन बुंध्यांभोवतीची जमीन मोकळी करण्याची मागणी डावखरे यांनी केली होती. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रस्तावाला प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.(Thane tree concrete removal)
 
उथळसरमध्ये सर्वाधिक कोंडमारा
 
काँक्रीट हटविण्याच्या प्रस्तावात उथळसर प्रभाग समितीतील सर्वाधिक १,००६ झाडांचा समावेश आहे. कळवा येथील ९३९, माजिवडा-मानपाडा येथील ९१० आणि वर्तकनगरमधील ७०१ झाडांभोवतीचे काँक्रीटही हटविण्यात येणार आहे. मुंब्रा येथे ६०९, नौपाडा-कोपरी येथे ६००, लोकमान्यनगर-सावरकरनगर येथे ५४०, वागळे येथे ५१२ आणि दिवा येथे ३७५ झाडांचा या कामात समावेश आहे.(Thane tree concrete removal)
 
या कामासाठी रस्ते दुरुस्ती या लेखाशीर्षाखाली निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. पुढील मंजुरीसाठी प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार असून, प्रत्येक प्रभाग समितीसाठी स्वतंत्र निविदा काढण्याचे नियोजन आहे. त्यामुळे प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे.
 
झाडांचे हेल्थ ऑडिटही आवश्यक
 
काँक्रीट हटविण्याच्या कामाबरोबरच शहरातील धोकादायक झाडांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पावसाळ्यात झाडे उन्मळून पडणे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील झाडांचे व्यापक हेल्थ ऑडिट करण्याची मागणी डावखरे यांनी केली आहे.(Thane tree concrete removal)
 
शाळा, रुग्णालये, बस व रेल्वे स्थानके, प्रमुख रस्ते, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणी असलेल्या झाडांची प्राधान्याने तपासणी करावी. तज्ज्ञांच्या अहवालानुसार धोकादायक ठरणाऱ्या झाडांवर वैज्ञानिक निकषांनुसार छाटणी किंवा अन्य आवश्यक उपाययोजना कराव्यात. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नियमित वृक्षतपासणीची यंत्रणा उभारण्याचीही मागणी करण्यात आली आहे.(Thane tree concrete removal)
 
शहरातील झाडांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबी लक्षात घेता, काँक्रीट हटविण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरविणे आणि वृक्षतपासणीची नियमित व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. आता महापालिका प्रशासन या दोन्ही बाबींवर किती वेगाने कार्यवाही करते, याकडे पर्यावरणप्रेमी आणि ठाणेकरांचे लक्ष(Thane tree concrete removal)
 




संबंधित मजकूर