मच्छीमारांना परवडणाऱ्या दरात गोदामे उपलब्ध करून द्या! : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

ससून डॉकच्या विकासकामांसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश; महिनाभरात पुन्हा आढावा

 
Sassoon Dock Affordable Warehouses
 
 
मुंबई, : (Sassoon Dock Affordable Warehouses) मुंबईतील ससून डॉकमधील मच्छीमारांना परवडणाऱ्या दरात गोदामे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदानाचा पर्याय विचारात घेण्यात येणार आहे. मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडील जागा केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे शासकीय दराने हस्तांतरित करून ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने धोरण तयार करावे. सध्याच्या गोदामधारकांची माहिती घेऊन लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा आणि त्यानुसार प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले.(Sassoon Dock Affordable Warehouses)
 
विधानभवन येथे ससून डॉक आणि तेथील मच्छीमार संघटनांच्या विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.(Sassoon Dock Affordable Warehouses)
 
मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून खासगी संस्था आणि शासकीय संस्थांना वेगवेगळ्या दराने जागा भाड्याने दिली जाते. त्यामुळे राज्य सरकारने शासकीय दराने जागा हस्तांतरित करून घेतल्यानंतर ती मच्छीमारांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावाचा महिनाभर ते दीड महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे.
ससून डॉकमधील बर्फ कारखाना, जलशुद्धीकरण प्रकल्प, मलनिस्सारण व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच पाणी आणि डिझेल वाहिन्यांसह विविध सुविधांचे एकात्मिक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अपूर्ण कामे, बंद असलेल्या सुविधा आणि वापराविना पडलेल्या यंत्रसामग्रीमुळे सार्वजनिक निधी वाया जाणार नाही, याची दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले.(Sassoon Dock Affordable Warehouses)
 
जेट्टीच्या दर्शनी भागातील सुमारे २५ ते ३० टक्के जागा बर्फ कारखान्यासाठी वापरल्यास मासेमारी नौका उभ्या करण्यासाठी उपलब्ध जागा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बर्फ कारखान्याची गरज कायम ठेवून त्यासाठी पर्यायी जागेची व्यवहार्यता तपासावी. बंदरात नौका लावण्याला प्राधान्य देत स्थानिक मच्छीमारांच्या गरजांनुसार विकासकामांचे नियोजन करावे, असे नार्वेकर यांनी सांगितले.(Sassoon Dock Affordable Warehouses)
 
ससून डॉकच्या कामांसाठी कालमर्यादा निश्चित करणार
 
ससून डॉकमधील गोदामांची व्यवस्था ही संपूर्ण मत्स्यव्यवसाय साखळीसाठी महत्त्वाची आहे, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. पुढील आठवड्यात ससून डॉकची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक मच्छीमारांच्या सूचना जाणून घेण्यात येतील. त्यानंतर पाणीपुरवठा, मलनिस्सारण वाहिन्या, रस्ते, लिलावगृह आणि इतर विकासकामांसाठी निश्चित कालमर्यादेचा कार्यक्रम तयार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.(Sassoon Dock Affordable Warehouses)
 
ससून डॉकची जेट्टी १०० मीटरने वाढविण्याची गरज लक्षात घेऊन जुन्या आणि नव्या जेट्टीचे स्वामित्व व ताबा यांची तपासणी करावी. जेट्टीच्या विस्ताराचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले. हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर गोदामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करता येईल, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.(Sassoon Dock Affordable Warehouses)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर