एसटीच्या १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर!

दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्यांवर भाडेवाढीचा अतिरिक्त भार नकोMSRTC Diwali fare hike


MSRTC Diwali fare hike
 
 
मुंबई, : (MSRTC Diwali fare hike)दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, महागाईमुळे आर्थिक ओढाताण सहन करणारा सर्वसामान्य नागरिक आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक, अशा परिस्थितीत जनतेवर भाडेवाढीचा अतिरिक्त भार कशासाठी, असा सवाल उपस्थित करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी प्रस्तावित केलेली १५ टक्के हंगामी भाडेवाढ नामंजूर केली.(MSRTC Diwali fare hike)
 
दरवर्षी दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. यंदाही १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने मंत्री सरनाईक यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर आणखी भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका घेत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. ‘आधीच संकटांनी घेरलेल्या जनतेला भाडेवाढीचा चटका देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे मला मान्य नाही,’ असे स्पष्ट करीत त्यांनी जनहिताला प्राधान्य दिले.(MSRTC Diwali fare hike)
 
एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असला, तरी त्याची भरपाई सर्वसामान्य प्रवाशांकडून करणे योग्य ठरणार नाही. एसटीची ‘लालपरी’ ही ग्रामीण महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्गासाठी ती परवडणाऱ्या प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे भाडेवाढीचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन खर्चावर झाला असता. विशेषतः दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना हा अतिरिक्त भार सहन करणे कठीण झाले असते.(MSRTC Diwali fare hike)
 
‘शासन संवेदनशील आहे. संकटाच्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही,’ असा विश्वास व्यक्त करीत मंत्री सरनाईक म्हणाले की, जनतेच्या अडचणी समजून घेऊन तिला दिलासा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. आर्थिक गणिते महत्त्वाची असली, तरी जनतेच्या वेदना आणि तिचा जगण्याचा संघर्ष यांचाही विचार होणे आवश्यक आहे.(MSRTC Diwali fare hike)
 
‘पर्यायी मार्गातून अडचणींवर मात करू’
 
एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधल्या पाहिजेत. दुर्गम गावांपासून शहरांपर्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी प्रवासी सेवा उपलब्ध करून देणे हे महामंडळाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे आर्थिक तोट्याचे ओझे थेट प्रवाशांवर टाकण्याऐवजी त्यावर अन्य मार्गांनी तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या संकटाच्या काळात त्यांच्या खिशाला हात घालण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे अधिक महत्त्वाचे आहे. एसटीच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधू; मात्र अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा देण्याचे कर्तव्य विसरणार नाही,’ या भूमिकेतून मंत्री सरनाईक यांनी प्रस्तावित भाडेवाढीला नकार देत सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला.(MSRTC Diwali fare hike)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर