_202610141127270397_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई : (Pravin Darekar Donation) राज्यात दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने भाजपा गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी आज आपल्या वाढदिवसादिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या रायगड प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. आ. दरेकरांच्या या सामाजिक उपक्रमाबद्धल मुख्यमंत्र्यांकडूनही त्यांचे कौतुक करण्यात आले.
राज्यातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता आ. प्रवीण दरेकर यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच वाढदिवसाच्या समारंभासाठी होणारा खर्च टाळून कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार आज वाढदिवसादिनी आ. प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रायगड प्रतिष्ठानच्या वतीने ११ लाख रुपयांचा धनादेश दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी या उद्देशाने सुपूर्द केला. यावेळी सोबत रायगड प्रतिष्ठानचे प्रमुख संयोजक डॉ. यश प्रवीण दरेकर होते.(Pravin Darekar Donation)
त्याचबरोबर आ. प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई शहर जिल्हा फेडरेशनतर्फे ५ लाखांचा, मुंबई उपनगर जिल्हा पश्चिम उपनगरेतर्फे २.५० लाख, सुभाष डोकरे यांच्यातर्फे १ लाखांचा, स्वाभिमानी युवा मित्र मंडळातर्फे ५१ हजाराचा आणि पांडुरंग वाघ यांच्यावतीने २१ हजारांचा धनादेश दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून देण्यात आले.(Pravin Darekar Donation)