पतीची हत्या करुन नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानला फाशीच! प्रियकरालाही सुनावला मृत्यूदंड

 
Meerut Blue Drum Murder Case Verdict
 
मेरठ (Meerut Blue Drum Murder Case Verdict) : उत्तर प्रदेशातील बहुचर्चित ‘ब्लू ड्रम’ हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने बुधवार,दि. १४ ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला. पती सौरभ राजपूत याची हत्या करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवल्याप्रकरणी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले होते.
 
हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला
 
मेरठमधील या हत्याकांडाने देशभरात खळबळ उडाली होती. मार्च २०२५ मध्ये मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांनी सौरभ राजपूत याची हत्या केल्याचा आरोप होता. हत्येनंतर मृतदेह सिमेंट आणि वाळूने भरलेल्या निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. (Meerut Blue Drum Murder Case Verdict)

१३ महिन्यांच्या खटल्यानंतर निकाल
 
या प्रकरणाची सुनावणी सुमारे १३ महिने चालली. सरकारी पक्षाच्या २२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने मुस्कान आणि साहिल यांना हत्या तसेच पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यानंतर शिक्षेवरील सुनावणी पूर्ण करून बुधवार,दि. १४ ऑक्टोबर रोजी दोघांना मृत्युदंड सुनावण्यात आला. (Meerut Blue Drum Murder Case Verdict)
 
दोघांनाही मृत्युदंड; दंडाचीही शिक्षा
 
जिल्हा न्यायाधीश अरविंद कुमार मिश्रा यांनी हा निकाल सुनावला. सरकारी पक्षाने हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे सांगत दोन्ही दोषींना मृत्युदंड देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने दोघांना मृत्युदंडासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार ५० हजार आणि २० हजार रुपयांचा दंडही ठोठावल्याचे वृत्त आहे.
 
अशा प्रकारचे गंभीर गुन्हे समाजावर आणि सामाजिक रचनेवर विपरीत परिणाम करतात. त्यामुळे गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि समाजाचे हित लक्षात घेऊन योग्य तो समतोल राखत शिक्षा सुनावणे, हे न्यायालयाचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. (Meerut Blue Drum Murder Case Verdict)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर