मुंबई, : (Malad Tree Plantation)देशभरात सुरू असलेल्या 'सेवा संकल्प अभियान' अंतर्गत आणि नवरात्रीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून बुधवारी, मालाड पश्चिम येथील स्वतंत्रता उद्यान (लिबर्टी गार्डन) बी. जे. पटेल मार्ग येथे ९ पुष्प वृक्षांची लागवड करण्यात आली. स्थानिक नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य तेजिंदरसिंग तिवाना यांच्या हस्ते आणि माजी नगरसेविका जया तिवाना यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत जाहीर केलेल्या 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत हा विशेष वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात मुंबईच्या पर्यावरण संतुलनाला पूरक ठरणाऱ्या आणि विविध पक्षांच्या आवडीच्या पुष्प वृक्षांची रोपे लावण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राचा राज्यवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, तसेच पक्षांच्या आवडत्या अशा 'ताम्हण' या वृक्षासह बकुळ, सोनचाफा, उंडल, बाहावा, टबेबिया आणि समुद्रफळ (बेरिंगटोनिया) अशा एकूण ९ फुलझाडांच्या रोपांचा समावेश आहे.(Malad Tree Plantation)
याप्रसंगी बोलताना तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत मालाड पश्चिम भागात विविध लोककल्याणकारी व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. 'मदत का ठिकाना तेजिंदर तिवाना' या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी विविध कार्यक्रम अखंडपणे सुरू असून, पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे."(Malad Tree Plantation)
हरित पट्टा वाढण्यास मदत
या वृक्षारोपणामुळे लिबर्टी गार्डन परिसरातील हरित पट्टा वाढण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. पी पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमास 'पी/पश्चिम' विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक योगेंद्रसिंग कच्छावा, कनिष्ठ वृक्ष अधिकारी प्रमोद इंगळे आणि भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Malad Tree Plantation)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....