मुंबई, :(Fodder Seed Distribution Maharashtra) राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने चारा उत्पादन कार्यक्रमांतर्गत चारा बियाणे व ठोंबे वाटपाच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून ही शिथिलता केवळ सन २०२६-२७ या वर्षासाठी लागू राहणार आहे.
सन २०२६-२७ मध्ये कमी पावसामुळे राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे चारा उत्पादनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.(Fodder Seed Distribution Maharashtra)
यापूर्वी वैयक्तिक लाभार्थ्यांकडे किमान तीन ते चार पशुधन असणे आवश्यक होते. आता २०२६-२७ या वर्षासाठी पशुधनाची अट शिथिल करण्यात आली आहे. वैयक्तिक लाभार्थ्याला एक हेक्टर क्षेत्रासाठी १०० टक्के अनुदानावर ४ हजार रुपये किमतीचे चारा बियाणे, तर शेतकरी समूह गटाला पाच हेक्टर क्षेत्रासाठी २० हजार रुपयांपर्यंत चारा बियाणे देण्यात येते. मात्र, आता चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्यास वैयक्तिक लाभार्थ्याला ४ हजार रुपये आणि शेतकरी समूह गटाला २० हजार रुपये किमतीचे चारा बियाणे एकापेक्षा अधिक वेळा देता येणार आहे. त्यासाठी प्रथम लाभ घेणाऱ्या अन्य पात्र अर्जदाराची मागणी उपलब्ध नसणे आवश्यक आहे.(Fodder Seed Distribution Maharashtra)
तसेच ही योजना वर्षातून एकदाच राबविण्यात येत असल्याने लाभार्थ्यांस वर्षातून एकदाच लाभ अभिप्रेत आहे. परंतू, आता चारा उत्पादन करण्यासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असल्याची खातरजमा करुन एकापेक्षा जास्त वेळा लाभ देता येणार असल्याचे या शासन निर्णयात म्हटले आहे.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा शेतकरी समूहाकडे चारा उत्पादनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध असल्याचे संबंधित उपायुक्त पशुसंवर्धन यांनी प्रमाणित करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच प्रथम लाभ घेणाऱ्या इतर अर्जदाराची मागणी प्रलंबित नसावी, अशी अट शासनाने घातली आहे.(Fodder Seed Distribution Maharashtra)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....