मुंबई (Adani Cement Maa Durga Image) : भक्ती, अभियांत्रिकी कौशल्य आणि सामूहिक प्रयत्नांचा अनोखा संगम साधत अदाणी सिमेंटने मध्य प्रदेशातील कैमोर येथील प्रकल्पात सिमेंटच्या तब्बल १५ हजार गोण्यांचा वापर करून माँ दुर्गेची भव्य प्रतिमा साकारली आहे. ७० फूट × ७० फूट क्षेत्रात उभारलेली ही कलाकृती कंपनीच्या नवरात्र आणि दुर्गापूजा २०२६ मोहिमेचे प्रमुख आकर्षण ठरली आहे. ‘जहाँ विश्वास, वहाँ शक्ती’ असे या मोहिमेचे शीर्षक आहे.
सिमेंट उद्योगातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचा कंपनीचा दावा आहे. एसीसी आणि अंबुजा सिमेंटच्या १५ हजार गोण्यांचा, म्हणजेच अंदाजे ७५० टन सिमेंटचा वापर करून ही प्रतिमा साकारण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण सुमारे १२ हजार ६०० मनुष्य-तासांचे श्रम खर्ची पडले. या प्रयत्नांतून माँ दुर्गेची अत्यंत आकर्षक प्रतिमा साकारण्यात आली आहे. जमिनीवरून पाहताना सिमेंटच्या गोण्यांची व्यवस्थित रचलेली एक विशाल मांडणी दिसते; मात्र आकाशातून पाहिल्यानंतरच या रचनेतून साकारलेली देवीची संपूर्ण प्रतिमा स्पष्टपणे दिसते. औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सिमेंटसारख्या साहित्याचे रूपांतर श्रद्धा आणि भक्तीच्या कलात्मक अभिव्यक्तीत करण्यात आले आहे.(Adani Cement Maa Durga Image)
आकाशातून टिपलेल्या दृश्यात माँ दुर्गेचा मुकुट, डोळे, दहा हात आणि देवीचे संपूर्ण स्वरूप स्पष्टपणे दिसते. प्रतिमेतील प्रत्येक तपशील गोण्यांच्या अचूक मांडणीवर अवलंबून होता. हजारो गोण्यांची योग्य जागी रचना करण्यासाठी अनेकांनी एकत्रितपणे प्रयत्न केले. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण अदाणी सिमेंटने केले असून, त्यातून तयार करण्यात आलेला डिजिटल व्हिडिओ कंपनीच्या सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांवर प्रसारित केला आहे. या चित्रफितीत जमिनीवरून सुरू होणारी गोण्यांची ने-आण आणि त्यांची टप्प्याटप्प्याने केली जाणारी मांडणी दाखवण्यात आली आहे. त्यानंतर कॅमेरा उंचीवर जाताच माँ दुर्गेची भव्य प्रतिमा प्रेक्षकांसमोर उलगडते.(Adani Cement Maa Durga Image)
या उपक्रमाचा उद्देश केवळ भव्य प्रतिमा साकारण्यापुरता मर्यादित नाही. नवरात्रोत्सवाचे धार्मिक महत्त्व आणि अदाणी सिमेंट समूहातील दोन प्रमुख ब्रँडची वैशिष्ट्ये यांची सांगड घालण्याचाही प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आला आहे. ‘शक्ती’ ही संकल्पना अंबुजा सिमेंटच्या सामर्थ्याच्या वचनाशी जोडलेली आहे, तर ‘विश्वास’ ही संकल्पना एसीसीच्या विश्वासार्हतेच्या परंपरेचे प्रतीक आहे. माँ दुर्गेच्या प्रतिमेच्या माध्यमातून या दोन्ही संकल्पना एकत्र आणत सामर्थ्य आणि विश्वास ही एकमेकांना पूरक मूल्ये असल्याचा संदेश देण्यात आला आहे.(Adani Cement Maa Durga Image)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक