नवी दिल्ली (Rahul Gandhi And Opposition Parties March To Supreme Court) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडी आघाडीच्या ११ नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत न्यायालयाकडे दाद मागितली आहे.
रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितला होता. परंतु; सरन्यायाधीशांच्या पुर्व नियोजीत कार्यक्रमामुळे भेट घण्यास नकार दिला, तसेच न्यायालयीन मार्गांने याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी विरोधी पक्षांचे नेते आणि समर्थकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढला. (Rahul Gandhi And Opposition Parties March To Supreme Court)
याचिका दाखल करण्यासाठी वेळ वाढवण्याची मागणी
याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात राहुल गांधी यांच्या कायदेशीर पथकाने सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीची वेळ वाढवण्याची मागणी केल्याचे वृत्त आहे. सामान्यतः सर्वोच्च न्यायालयाची ई-फायलिंग सुविधा ऑनलाइन याचिका दाखल करण्यासाठी उपलब्ध असते. (Rahul Gandhi And Opposition Parties March To Supreme Court)
दरम्यान, SIR प्रक्रियेतील कथित अनियमिततांबाबत विरोधकांनी आरोप केले असले, तरी त्यावर न्यायालयाचा अंतिम निर्णय झालेला नाही. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
"राहुल हे हवेतल्या गप्पा मारणारे नेते आहेत"- अनुराग ठाकुर
भाजप नेते अनुराग ठाकूर म्हणाले, “राहुल हे हवेतल्या गप्पा मारणारे नेते आहेत. ते केवळ खोटे बोलत राहतात. आता तर ते रस्त्यावरच्या भाषेवर उतरले आहेत. राहुल गांधी, देशाला गोंधळ नको, सत्य हवे आहे. आरोप नकोत, पुरावे हवेत. तुम्ही राष्ट्रपतींकडे गेलात, तेव्हा तुम्हाला पुरावे दाखवण्यास सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टपणे सांगितले की, न्यायालयाला तुम्ही राजकारणाचे रणांगण बनवू शकत नाही.” (Rahul Gandhi And Opposition Parties March To Supreme Court)
"काँग्रेसच्या पराभवाला पक्षाचे नेतृत्वच जबाबदार" मंत्री शिवराज सिंह चौहान
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस देशातील संवैधानिक संस्थांवर हल्ले करत आहे. काँग्रेस निवडणुकीतील पराभवाचे खापरही या संवैधानिक संस्थांवर फोडत आहे. काँग्रेसच्या पराभवाचे सत्र सातत्याने सुरू आहे. एकामागून एक पराभव आणि त्यातून निर्माण झालेली नाराजी आंदोलन करून रस्त्यावर व्यक्त करणे, हीच काँग्रेसची नियती बनली आहे.
काँग्रेसच्या पराभवाचे कारण निवडणूक आयोग नसून, पक्षाचे विचारशून्य नेतृत्व आहे. उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये पक्षांतर्गत कुरघोड्या सुरूच आहेत. पंजाबमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलावा लागला. कर्नाटकमध्ये कधी सिद्धरामय्या, तर कधी डी. के. शिवकुमार यांच्यातील वाद समोर येतो. काँग्रेसच्या पराभवाला जर कोणी जबाबदार असेल, तर ते पक्षाचे नेतृत्व आहे. या नेतृत्वाला देशातील जनता आणि इथल्या परंपरांची जाण नाही. (Rahul Gandhi And Opposition Parties March To Supreme Court)
"विरोधकांना संविधानावर विश्वास नाही"- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारताच्या सरन्यायाधीशांनी एखाद्या विरोध मोर्चाला भेटायलाच हवे, असे संविधानात कुठे लिहिले आहे? तुम्हाला काही तक्रार असेल, तर तुम्ही न्यायालयात जाऊन कायदेशीर मार्गाने लढले पाहिजे.” सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली ही गोष्ट योग्य आहे.
ते पुढे म्हणाले, “विरोधकांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, त्यांचा संविधानावर कोणताही विश्वास नाही आणि ते संविधानविरोधी आहेत. सरन्यायाधीशांनी आपल्या संविधानीत कर्तव्यांचे पालन करत विरोध मोर्चाला भेटू शकत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा एक कट आहे.” (Rahul Gandhi And Opposition Parties March To Supreme Court)
कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले, “आंदोलनाची परवानगी मिळवण्यासाठी १० दिवस आधी संपर्क साधावा, असे पोलीस सर्वांना सांगतात. आता आम्हीच पोलिसांना सांगत आहोत की, त्यांनी स्वतः आम्हाला जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची तारीख आणि वेळ कळवावी. आम्ही पोलिसांना २४ तासांचा अल्टिमेटम देत आहोत.” (Rahul Gandhi And Opposition Parties March To Supreme Court)
दिल्लीत ३० हजारांहून अधिक जवान तैनात
राजधानी दिल्लीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली असून, सुमारे ३० हजारांहून अधिक सुरक्षा जवान तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलांची तैनाती, ठिकठिकाणी लावलेले बॅरिकेड्स आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यामुळे दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे. (Rahul Gandhi And Opposition Parties March To Supreme Court)
सरन्यायाधीशांनी पत्राद्वारे स्पष्ट केली भेट नाकारण्यामागची कारणे
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सोमवारी सांगितले की, त्यांनी इंडी आघाडीच्या खासदारांना भेटू न शकण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. रविवार, दि. १० ऑक्टोबर रोजी, विरोधी पक्षांकडून पत्र मिळाले होते. त्याला त्यांनी त्याच रात्री उत्तर दिले. या उत्तरात त्यांनी भेट घेता न येण्याची कारणे नमूद केली आहेत. (Rahul Gandhi And Opposition Parties March To Supreme Court)
पत्रात नेमके काय लिहिले होते, असा प्रश्न विचारण्यात आला असता सरन्यायाधीश म्हणाले, “हे तुम्ही विरोधी पक्षांच्या खासदारांना विचारा.” ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. कोणत्याही सामान्य नागरिकाला किंवा लोकनियुक्त लोकप्रतिनिधीला याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. न्यायालय त्यांच्या समस्या ऐकून घेईल आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल.
दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची पुढील रणनीती आणि संभाव्य हालचालींकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Rahul Gandhi And Opposition Parties March To Supreme Court)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.