प्रगतशील महाराष्ट्र २०२६ प्रदर्शनामध्ये; महानिर्मितीच्या दालनाला “सर्वोत्कृष्ट इनोवेशन अँड कम्युनिकेशन दालन” पुरस्कार

    12-Oct-2026


MahaGenco Award 2026

जळगाव : खासदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे केंद्र व राज्य शासनाच्या ७०+ आस्थापनांचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र २०२६ भव्य प्रदर्शनामध्ये महानिर्मितीच्या दालनाला “सर्वोत्कृष्ट इनोवेशन अँड कम्युनिकेशन दालन” पुरस्काराने गौरवण्यात आले.
 
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी ( महानिर्मिती ) च्या अतिशय माहितीपूर्ण दालनामध्ये महानिर्मितीची स्थापित क्षमता , विकसित महाराष्ट्र २०४७ अनुरूप महानिर्मितीचे व्हिजन प्रदर्शित करण्यात आले होते. यासोबतच महानिर्मितीचे माननीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. ( भा.प्र.से) यांचे नेतृत्वामध्ये उभारणी करण्यात येत असलेले महानिर्मितीचे पर्यावरणपूरक उपक्रम आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प यांची माहिती देण्यात आली.(MahaGenco Award 2026)
 
दालनामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली आणि विजेत्यांचा गौरव करण्यात आला. या प्रदर्शनाला बारा हजार पेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी भेट दिली. महानिर्मितीच्या वतीने सदर पुरस्कार सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांनी खासदार स्मिता वाघ तसेच आमदार अनिल पाटील यांचे हस्ते देण्यात आला. (MahaGenco Award 2026)
 
यावेळी महानिर्मितीच्या भुसावळ औश्निक वीज निर्मिती केंद्र येथील उपमुख्य अभियंता वैशाली पाटील यांचा माननीय खासदार  स्मिता वाघ यांनी विशेष सन्मान केला आणि अहोरात्र सुरु असलेल्या वीज निर्मिती क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महिला कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले. (MahaGenco Award 2026)
 
महानिर्मिती तर्फे महिला कर्मचाऱ्यांकरीता देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल त्यांनी महानिर्मिती व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. या यशाबद्दल माननीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. (भा.प्र.से.), संचालक अभय हरणे, संचालक (वित्त) मनेष वाघीरकर, संचालक (प्रकल्प) राजेश पाटील, संचालक (इंधन) विजय राठोड तसेच सर्व वरिष्ठ व्यवस्थापन यांनी जनसंपर्क विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या दालनामध्ये महानिर्मितीतर्फे अभियंता सुमित मुगल, जयेश कोल्हे तसेच दिनेश पवार यांनी विविध उपक्रम आणि योजनांची माहिती दिली. (MahaGenco Award 2026)





संबंधित मजकूर