मुंबई (Journalists Attack and Trolling Case): जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला झालेली मारहाण तसेच वृत्तवाहिनीच्या संपादिका वृषाली कदम यांना सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्रोलिंगप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विविध पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. (Journalists Attack and Trolling Case)
वृषाली कदम यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, पांडुरंग म्हस्के, मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किरण जोशी यांच्यासह विविध पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांना लक्ष्य करून होणाऱ्या ट्रोलिंगबाबत निवेदन सादर केले. (Journalists Attack and Trolling Case)
पत्रकारांना त्यांचे कर्तव्य निर्भयपणे बजावता आले पाहिजे. पत्रकारांना मारहाण करणे, धमकावणे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य करणे या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. (Journalists Attack and Trolling Case)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. (Journalists Attack and Trolling Case)