गरब्यात लव्ह जिहाद केल्यास पोलिसांचा ‘दांडिया’!

 
Nitesh Rane Garba Warning
 
मुंबई, : (Nitesh Rane Garba Warning) नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांची छेडछाड, लव्ह जिहादचा प्रयत्न किंवा खोटी ओळख सांगून प्रवेश केल्यास संबंधितांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा इशारा देत, राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असून माता-भगिनींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची भूमिका मांडली.
 
नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतानाच राणे यांनी गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांना लक्ष्य केले. उत्सवात सहभागी होणाऱ्या महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणे, त्यांची छेड काढणे किंवा लव्ह जिहादचा प्रयत्न करणे खपवून घेतले जाणार नाही, असे ते म्हणाले. राज्य सरकार म्हणून हिंदुत्व विचाराचे सरकार आमच्या राज्यात आहे.(Nitesh Rane Garba Warning)
 
"कुठल्याही हिंदू माता भगिनींकडे कोणी ह्या निमित्ताने नावे बदलून ओळख खोटी सांगून अगर आतमध्ये शिरला. तर मग पोलिसांबरोबर दांडिया खेळायला लागेल. जायचंच असेल तर परत सांगतो घरवापसी करा. जो मूळ धर्म हिंदू धर्म यात या.आमच्या मूर्तीपूजा करा. दुर्गामातेची एक आरती म्हणा. महाआरती करा. हनुमान चालीसा म्हणा आणि जा दांडिया खेळायला काही हरकत नाही. पण उगाच दाढी कुरवळत गोल टोप्या. अगर कुठे आम्हाला तिथे दिसला तर मग पोलिसांच्या दांडिया खेळायला पोलिसांबरोबर दांडिया खेळायला लागतील" इशाराच नितेश राणेंनी दिला आहे. यावेळी पोलिसांच्या कारवाईचा उल्लेख करताना त्यांनी ‘पोलिसांचा दांडिया’ असा उपरोधिक शब्दप्रयोग केला. गैरप्रकार करणाऱ्यांना कारवाईचा चांगलाच धडा मिळेल, असेही ते म्हणाले.(Nitesh Rane Garba Warning)
 
यावेळी राणे यांनी ‘घरवापसी’चा उल्लेख करत हिंदू धर्मात परतण्याचे आवाहनही केले. नवरात्रोत्सवाच्या काळात धार्मिक भावना दुखावणारे किंवा महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे प्रकार सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नवरात्रोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडावा, यासाठी आयोजकांनीही सतर्क राहावे, असा संदेश त्यांच्या इशाऱ्यातून देण्यात आला.(Nitesh Rane Garba Warning)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर