मुंबई (Dr Vishal Kadane): राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा व्हावे, तसेच शालार्थ प्रणालीतील त्रुटींमुळे वेतन देयकांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची माहिती, डिजिटलायझेशन, जन्मतारीख, रुजू दिनांक आणि इतर तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोव्हेंबर २०२६ पासून वेतन देयकांची पडताळणी अधिक काटेकोरपणे केली जाणार असून, त्रुटींची पूर्तता न करता वेतन देयके सादर केल्यास ती मंजूर न करण्याची भूमिका संचालनालयाने स्पष्ट केली आहे. (Dr Vishal Kadane)
शिक्षण संचालनालयाच्या ९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, शालार्थ प्रणालीतील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मंजूर पदांपेक्षा अधिक पदे, तसेच संघमान्यता आणि शालार्थ प्रणालीतील नोंदींमधील विसंगती यांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका शाळेत एकापेक्षा अधिक पदे मंजूर असल्यास त्यासंबंधीची माहिती अचूक नोंदविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, डिजिटलायझेशन, जन्मतारीख, रुजू दिनांक, शालार्थ क्रमांक आणि इतर तांत्रिक त्रुटी दूर करण्यावर भर देण्यात आला आहे. शाळांमधील मंजूर पदांपेक्षा अधिक पदांवर वेतन देयके सादर होणार नाहीत, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे. नोव्हेंबर २०२६ पासून वेतन देयकांच्या पडताळणीदरम्यान या बाबींची तपासणी केली जाणार आहे. (Dr Vishal Kadane)
शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी शालार्थ प्रणालीतील नोंदी तपासून आवश्यक दुरुस्त्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्रुटींची पूर्तता न करता वेतन देयके सादर केल्यास ती मंजूर न करण्याची भूमिका शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केली आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी निर्धारित मुदतीत माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे शालार्थ प्रणालीतील नोंदी अधिक अचूक होण्यास आणि वेतन देयकांमधील तांत्रिक अडथळे दूर होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्रुटींच्या पूर्ततेची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आणि वेतन देयकांची मंजुरी मिळणे यावर संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळणे अवलंबून राहणार आहे. (Dr Vishal Kadane)
डॉ. विशाल कडणे यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबईतील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित सुरू राहावे, या मागणीसाठी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे संचालक डॉ. विशाल कडणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शिक्षक अतिरिक्त नाहीत, तर उपलब्ध आहेत, अशी भूमिका घेत त्यांनी उपलब्ध शिक्षकांचे मुंबईतील शाळांमध्ये समायोजन करावे, त्यांचे वेतन नियमित सुरू ठेवावे आणि कोणत्याही शिक्षकावर वेतन बंद होण्याची वेळ येऊ नये, अशी मागणी केली. तसेच या प्रश्नासंदर्भात त्यांनी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचीही भेट घेतली. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रक्रियेला गती मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. (Dr Vishal Kadane)
"केवळ परवानगी मिळणे हा अंतिम टप्पा नसून प्रत्यक्ष वेतनप्रक्रिया सुरळीत होणे आवश्यक आहे. यासाठी शालार्थ टीमच्या स्तरावर पाठपुरावा सुरू असून, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांचे वेतन वेळेत मिळावे, यासाठी मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ प्रयत्नशील आहे. शिक्षकांचे समायोजन करा, मात्र त्यांचे वेतन थांबवू नका. शिक्षक अतिरिक्त नसून ते शिक्षणव्यवस्थेतील उपलब्ध मनुष्यबळ आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग मुंबईतील शाळांमध्ये करून घ्यावा. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला बाधा न आणता समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रत्यक्ष वेतनप्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन जमा होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे." (Dr Vishal Kadane)
- डॉ. विशाल कडणे, संचालक, मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....