नवी दिल्ली (CJP Delhi Jantar Mantar Protest) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे पडसाद केवळ दिल्लीतच नव्हे, तर देशातील इतर शहरांमध्येही उमटले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, यूट्यूबर ध्रुव राठी आणि काव्या कर्नाटक उर्फ केके क्रिएट यांनाही पोलिसांद्वारे ताब्यात घेण्यात आले.
दीपके यांच्या अटकेनंतर आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदेंकडे
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी आंदोलनाची सूत्रे अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपविल्याचे सांगितले. तसेच, आंदोलकांनी अजिंक्य शिंदे यांना साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अजिंक्य शिंदे हे अभिजीत दीपके यांचे जुने सहकारी असल्याचे सांगितले जाते. दोघांची भेट २०१६ मध्ये गोव्यात झाली होती. त्यानंतर दोघांनीही आम आदमी पार्टीमध्ये एकत्र काम केले. (CJP Delhi Jantar Mantar Protest)
पोलिसांवर दगडफेक; दोन कर्मचारी जखमी
सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेक आंदोलक जंतर-मंतरच्या दिशेने जात होते. याचदरम्यान आंदोलकांच्या एका गटाने ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’च्या (पीटीआय) इमारतीजवळ जमाव केला. हा जमाव रोखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. (CJP Delhi Jantar Mantar Protest)
दगडफेकीनंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे ५० आंदोलकांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरातील तणाव वाढला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. (CJP Delhi Jantar Mantar Protest)
रविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी नेते ताब्यात
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हेही आंदोलनात सहभागी होण्यासाठी जंतर-मंतरच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. (CJP Delhi Jantar Mantar Protest)
पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि आंदोलकांना रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पोलिसांनी जिथे अडवले आहे, तिथेच आंदोलन सुरू करा आणि संपूर्ण देशाला जंतर-मंतर बनवा, असे आवाहन त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. (CJP Delhi Jantar Mantar Protest)
दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला असून, तुषार गांधी यांच्यासह अन्य काही नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई-पुण्यातही आंदोलनाचे पडसाद
दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद मुंबई आणि पुण्यातही उमटले. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ सुमारे ४०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तसेच, पुण्यासह अन्य ठिकाणीही आंदोलन करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, देशातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान आतापर्यंत १ हजार ७०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. (CJP Delhi Jantar Mantar Protest)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.