मुंबई: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनही पर्यटक, विद्यार्थी, मोठ्या संख्येने समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंदघेण्यासाठी येत असतात. मात्र,आज येथील दिवेआगर समुद्र किनारी मोठी दुर्घटना घडली असून 8 जणांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Diveagar Beach Tragedy)
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथून एका खासगी कोचिंग क्लासची सहल दिवेआगर येथे फिरण्यासाठी आली होती. किनाऱ्यावर आनंद लुटत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ८ जण समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले आणि बुडू लागले.घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली, तसेच स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले. (Diveagar Beach Tragedy)
बुडलेल्या आठही जणांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून पर्यटकांना समुद्रात उतरताना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Diveagar Beach Tragedy)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....