नवी दिल्ली (Captain Smit Machar PM Modi Praise) : स्वतःचा जीव धोक्यात घालत १७४ प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे जगभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंपर्यंत अनेकांनी कॅप्टन स्मित यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानात अचानक खळबळजनक घटना घडली. विमान सुमारे ३४ हजार फूट उंचीवर असताना कॅप्टन स्मित मच्छार यांच्या को-पायलटने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला विमान खाली कोसळावे, या उद्देशाने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Captain Smit Machar PM Modi Praise)
हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही कॅप्टन स्मित यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता को-पायलटचा सामना केला. त्यांनी कॉकपिटचा मुख्य दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या मदतीने हल्लेखोराला पकडण्यात आले. त्यांच्या या धाडसी प्रयत्नामुळे विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचले. (Captain Smit Machar PM Modi Praise)
बेंजामिन नेतन्याहूंनी केले कौतुक
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही कॅप्टन स्मित यांच्या धाडसाचे कौतुक केले. आपल्या वक्तव्यात नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित यांच्या भूमिकेचा उल्लेख करत, “एका भारतीयाने ९/११सारखी दुर्घटना होण्यापासून वाचवले,” असे म्हटले. (Captain Smit Machar PM Modi Praise)
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले. गंभीर जखमी असतानाही इतरांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी दाखवलेले धैर्य आणि निर्धार कौतुकास्पद असल्याचे मोदी यांनी म्हटले. तसेच मच्छार यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, कॅप्टन मच्छार यांच्यावर सौदी अरेबियातील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले आहे. या घटनेतील हल्ल्याचा नेमका हेतू आणि इतर संभाव्य बाबींचा तपास सुरू आहे. (Captain Smit Machar PM Modi Praise)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.