दुबई (Captain Smit Machchhar Attack) : आकाशात हजारो फूट उंचीवर विमान उडत असताना कॉकपिटमध्येच पायलटवर हल्ला झाला तर काय होईल? फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानातील घटनेने विमान सुरक्षेसमोर असाच गंभीर प्रश्न उभा केला आहे. बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या या विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर त्यांच्या को-पायलटकडून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतरही कॅप्टन मच्छार यांनी धैर्य न गमावता परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि विमान सुरक्षितपणे उतरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत १७४ प्रवाशांचा जीव वाचवला.
स्मित मच्छार यांच्या धाडसाची चर्चा आता जगभरात होत आहे. ३४ हजार फूट उंचीवर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या धैर्याचे कौतुक करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यापर्यंत अनेक मान्यवरांनी मच्छार यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. (Captain Smit Machchhar Attack)
३४ हजार फूटांवर नेमकं काय घडलं?
फ्लाइट FZ1073 सुमारे ३४ हजार फूट उंचीवर असताना कॉकपिटमध्ये अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. उपलब्ध माहितीनुसार, ओमानी को-पायलटने भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीच्या वृत्तांमध्ये चाकूने हल्ला केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यासाठी कुऱ्हाडीसदृश ‘क्रॅश ॲक्स’ वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले. (Captain Smit Machchhar Attack)
या हल्ल्यात कॅप्टन मच्छार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी धैर्य न सोडता परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. उपलब्ध माहितीनुसार, हा हल्ला विमानाचे क्रॅश लँडिंग घडवून आणण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
विमानातून पाठवला ‘7500’ कोड
या घटनेदरम्यान विमानाची उंची मोठ्या प्रमाणात कमी झाली. विमान सुमारे १६ हजार फूट उंचीपर्यंत खाली आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी विमानातून 7500 ट्रान्सपोंडर कोड प्रसारित करण्यात आला. (Captain Smit Machchhar Attack)
विमान वाहतुकीमध्ये 7500 हा कोड विमानातील unlawful interference, म्हणजेच बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा संभाव्य हायजॅकिंगसारख्या परिस्थितीचा संकेत देतो. त्यामुळे संबंधित सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
फायटर जेट्सही करण्यात आले अलर्ट
विमानातील परिस्थितीमुळे संभाव्य हायजॅकिंगची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर परिसरातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आणि फायटर जेट्स अलर्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली. (Captain Smit Machchhar Attack)
यानंतर विमानाचे गंतव्य बदलून ते सौदी अरेबियातील तबूक येथे उतरवण्यात आले. विमानातील सर्व १७४ जणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय ठरला.
बेंजामिन नेतन्याहूंचा दावा- 'कुऱ्हाड'ने झाला हल्ला
घटनेनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक केले. नेतन्याहू यांच्या माहितीनुसार, कॅप्टन मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्ये असलेल्या ‘क्रॅश ॲक्स’ने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी धैर्य न गमावता हल्लेखोराचा सामना केला आणि कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर विमानातील प्रवासी आणि क्रू सदस्यांनी मिळून हल्लेखोराला काबूत घेतले. दरम्यान, विमानातील एका दंतचिकित्सकाने जखमी कॅप्टन मच्छार यांना प्राथमिक वैद्यकीय मदत दिल्याची माहितीही समोर आली आहे. (Captain Smit Machchhar Attack)
कॉकपिटमध्ये ‘क्रॅश ॲक्स’ असते तरी कशासाठी?
या घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे कॉकपिटमध्ये कुऱ्हाड असते तरी कशासाठी? ‘क्रॅश ॲक्स’ हे विमानातील आपत्कालीन उपकरण आहे. आग, विमानाच्या संरचनेत अडथळा निर्माण होणे किंवा आपत्कालीन परिस्थितीत एखादा भाग कापून मार्ग तयार करण्याची गरज भासल्यास त्याचा वापर केला जाऊ शकतो.
म्हणजेच कॉकपिटमध्ये असे उपकरण असणे असामान्य नाही. मात्र, याच उपकरणाचा एका क्रू सदस्याने दुसऱ्या पायलटवर हल्ल्यासाठी कथित वापर केल्याने विमान सुरक्षेच्या नियमांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Captain Smit Machchhar Attack)
विमान सुरक्षेच्या दृष्टीने हा या घटनेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. ९/११ च्या हल्यानंतर कॉकपिटची सुरक्षा मोठ्या प्रमाणात कडक करण्यात आली. कॉकपिटचे दरवाजे, प्रवेश नियंत्रण आणि क्रू सुरक्षेसंदर्भात अनेक नियम लागू करण्यात आले.
यापूर्वी जर्मनविंग्ज दुर्घटनेनंतरही विमानाच्या आतून निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत गंभीर चर्चा झाली होती. FZ1073 मधील घटनेमुळे पुन्हा एकदा ‘Insider Threat’ म्हणजेच विमानातीलच एखाद्या व्यक्तीकडून निर्माण होणाऱ्या धोक्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. (Captain Smit Machchhar Attack)
या घटनेचा तपास अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर केंद्रित होऊ शकतो. हल्ल्यामागील नेमके कारण काय होते? को-पायलटने कॉकपिटमधील इमर्जन्सी उपकरणापर्यंत कसा प्रवेश मिळवला? हल्ल्यानंतर कॉकपिट आणि विमानातील सुरक्षा प्रोटोकॉल कसे कार्यरत झाले? तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विमान सुरक्षा नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे का?
या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येतील. मात्र, ३४ हजार फूटांवर निर्माण झालेल्या संकटात विमान सुरक्षितपणे जमिनीवर आणण्यात कॅप्टन स्मित मच्छार आणि इतर क्रू सदस्यांची भूमिका आता चर्चेचा विषय ठरली आहे. (Captain Smit Machchhar Attack)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.