पहिल्या शंभर दिवसात सरकारचे मिशन ई कॉमर्स - सरकारी अधिकारी

ई कॉमर्स मधील निर्यातीत वाढ करण्यासाठी २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष

    01-May-2024
Total Views |

e commerce
 
 
मुंबई: पहिल्या शंभर दिवसांत मोदी सरकारने काही धोरणात्मक निर्णय घेण्याचे ठरवले आहे. सत्तेत परतल्यावर 'मिशन १००' यामध्ये आता ई कॉमर्स क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये भारतातील ई कॉमर्स निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा योजना बद्ध प्रयत्न सरकारकडून करण्यात येणार आहे. वित्त मंत्रालय आरबीआय व इतर नियामक मंडळांच्या सहकार्याने पहिल्या १०० दिवसात इ कॉमर्स क्षेत्रातील उलाढाल वाढवण्यासाठी सरकारने काही विशेष योजना केल्या आहेत.
 
यासाठी नव्या योजनेसाठी मंत्रालयांना कामाला लागण्याचे आदेश जारी सरकारकडून जारी करण्यात आलेले आहेत. यामध्ये निर्यात प्रकिलयेला लागणारी विविध सामग्री पुरेशी आहे का नाही याची पडताळणी स्वतः सरकार करणार आहे. वेअर हाऊसिंग, लेबलिंग, टेस्टिंग, पॅकेजिंग, प्रोसेसिंग अशा विविध पातळ्यांवर मूलभूत सुविधेत वाढ करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे.
 
याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ओर्गानायझेशनचे डायरेक्टर जनरल अजय सहाय म्हणाले, हे एक प्रकारचे बंधनकारक क्षेत्र असेल जे ई-कॉमर्स कार्गोची निर्यात आणि आयात सुलभ करेल आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा आयातीची समस्या दूर करेल कारण ई-कॉमर्समध्ये सुमारे २५ टक्के वस्तू पुन्हा आयात केल्या जातात. हब देखील एक प्रकारची निर्यात-केंद्रित युनिट्स आहेत आणि खाजगी क्षेत्राला ही हब विकसित करण्यासाठी पुढे यावे लागेल,"असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) चे महासंचालक अजय सहाय म्हणाले.
 
गेल्या वर्षी, क्रॉस-बॉर्डर ई-कॉमर्स व्यापार सुमारे युएसडी 800 अब्ज होता आणि २०३० पर्यंत युएसडी २ ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अलीकडेच परकीय व्यापार महासंचालक (DGFT) संतोष कुमार सारंगी यांनी म्हटले आहे की ई-कॉमर्स माध्यमातून निर्यात वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे. गेल्या वर्षी, क्रॉस-बॉर्डर ई-कॉमर्स व्यापार सुमारे युएसडी ८०० अब्ज होता आणि २०३० पर्यंत युएसडी २ ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
 
याशिवाय अधिक बोलताना सहायक म्हणाले, 'आपल्याला निर्यातीत वाढ करण्यासाठी योग्य धोरणे आखण्याची गरज आहे.ई कॉमर्स इकोसिस्टीमला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. चीनची ई कॉमर्स निर्यात ३५० युएसडी डॉलर्सवर आहे भारताची निर्यात केवळ युएसडी २ बिलियन आहे.'
 
आर्थिक थिंक टँक GTRI च्या अहवालानुसार भारताची ई-कॉमर्स निर्यात २०३० पर्यंत युएसडी ३५० अब्जांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे, परंतु बँकिंग समस्या वाढीस अडथळा आणतात आणि ऑपरेशनल खर्चात वाढ करतात.
 
भारताचा ई-कॉमर्स उद्योग प्रामुख्याने लहान व्यवसायांद्वारे चालवला जातो जे युएसडी २५ ते युएसडी १००० च्या दरम्यानची उत्पादने निर्यात करतात. लोकप्रिय वस्तूंमध्ये हस्तकला, कला, पुस्तके, तयार कपडे, नकली दागिने, रत्ने आणि दागिने, होम डेकोर, आयुर्वेद उत्पादने आणि क्रीडा वस्तूंचा समावेश आहे. या विशिष्ट उत्पादनांना त्यांच्या अद्वितीय कलाकृतींमुळे बाजारपेठ मिळाली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
 
भारताने २०३० पर्यंत युएसडी १ ट्रिलियन व्यापारी मालाच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सीमापार ई कॉमर्स व्यापार एक स्रोत म्हणून ओळखला गेला आहे. यामुळे आगामी काळात भारत पहिल्या शंभर दिवसांत इ कॉमर्स क्षेत्रातील उलाढाल वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची शक्यता आहे.