भगवान श्रीकृष्णाचे आयुध सुदर्शनचक्र मानले आहे. वास्तविक भगवान श्रीरामचंद्र व भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूचेच अवतार मानले जातात. परंतु, भगवान श्रीविष्णूंचे आवडते आयुध सुदर्शन श्रीरामांनी नाकारून धनुष्यबाणच आपल्या खांद्यावर ठेवले. श्रीकृष्णाने मात्र विष्णूंचा सुदर्शनाचा वारसा चालू ठेवला. कित्येकजण सुदर्शन म्हणजे ऑस्ट्रेलियातील मावरीजन वापरत असत तसल्या ‘बूमरँग’सारखे शस्त्र मानतात आणि अशी तुलना करून श्रीकृष्णाला मागासलेल्या मावरींच्या पंक्तीत बसवितात. सुदर्शनचक्राचे रहस्य कळण्यास आपल्याला हठयोगातील शवासन साधनेने जडशरीराबाहेर पडण्याचा व अंतराळात जीवात्म्यासह फिरल्यावर परत आपल्या नियत जडशरीरात परत शिरण्याचा दिव्य अभ्यास माहीत असायला हवा.
तो अनुभव असल्याशिवाय सुदर्शनाचे रहस्य कळणार नाही. लेखक व लेखकाशी संबंधित भारतातील अनेक साधकांनी असले दिव्य अनुभव घेतले असल्याने त्या दिव्य अनुभवांना धरून लेखक सुदर्शनरहस्य लिहीत आहे. बुद्धिवानांना त्यातील रहस्य लवकर उमजेल. फक्त पुस्तकी विद्वत्तेवर आपण दिव्य ग्रंथांचा अर्थ लावू शकत नाही आणि बळेच लावल्यास व्यासमुनी व वाल्मिकींच्या दिव्य साधनानुभवास आपण पारखे होऊ. दुर्दैवाने आज साधनाच नामशेष झाल्यासारख्या असल्याने श्रेष्ठ वैदिक ज्ञानातील सत्य आपल्याला कळत नाहीत आणि एक प्रकारच्या अज्ञानात आजचा भारतीय समाज धुंद होऊन वावरत आहे.
‘कुंभक’ प्राणायाम सिद्ध झाल्यावर योग्य मार्गदर्शनाखाली क्रमशः शिथिलासन, योगनिद्रा, शवासन साधना करून साधक जीवात्मा ज्यावेळेस आपल्या जडदेहाबाहेर निघतो, त्यावेळेस त्याला खालील दिव्य अनुभव येत असतात. प्रथम श्वास बंद पडतो. नंतर रुधिराभिसरण बंद पडते. त्यानंतर जीवात्मा भ्रूमध्यातून बाहेर पडतो. बाहेर पडतानाच त्याच्या दिव्य दृष्टीला एक भयंकर वेगाने फिरणारे दिव्य प्रकाशमान चक्र दिसते. त्या चक्राचा नाद साधारणत: सायरनसारखा, सर्वनादांच्या कल्लोळासारखा ऐकू येतो. विशेष म्हणजे, त्या दिव्यचक्राची गती ‘अपसव्य’ (अपींळलश्रेलज्ञुळीश) असते. जडशरीरात परत येताना त्या विरुद्ध अनुभव येतात. प्रथम ते दिव्यचक्र त्याच आभेने व त्याच नादाने फिरताना दिसते. पण यावेळी त्या चक्राची गती ‘सव्य’ म्हणजे (उश्रेलज्ञुळीश) असते. आपण मंदिरात प्रदक्षिणा याच दिव्य गतीला धरून करीत असतो.
जड व सूक्ष्म शरीर विघटन होताना, त्या दिव्यचक्राची गती ‘अपसव्य’, तर शरीरात प्रवेश करताना म्हणजेच घटनाप्राप्ती करताना त्या चक्राची गती ‘सव्य’, प्रदक्षिणा अथवा (उश्रेलज्ञुळीश) असते. या विश्वातील घटना व विघटन याच महान तत्त्वावर आधारित आहेत. विघटन होताना म्हणजे अस्तित्व नष्ट होताना, विश्वातील वस्तू विभाजन होताना विश्वचक्राची (इलेक्ट्रॉन) गती ‘अपसव्य’ असते, तर वस्तुसंधारणा होत असताना वा अस्तित्व तयार होताना तीच दिव्यगती ‘सव्य’ वा प्रदक्षिणा होत असते, हा अनुभव आहे, या कल्पना नव्हेत. यावरून आणखी एक सत्य संस्कार आपल्या लक्षात येतो आणि तो हा की, घटनाप्राप्तीच आपल्याला आवडत असल्याने घटनाप्राप्ती होत असताना त्या दिव्यचक्राची जी ‘सव्य’ गती असते, तीच आपल्याला प्रिय असते. दर्शनाकरिता ‘सु’ म्हणजे चांगली असते.
आता ज्या दिव्य चक्रगतीने जीवांना आनंद होता ती दिव्य चक्रगती जीवांना ‘सु-दर्शन’ राहील. सृष्टीमध्ये जीवाच्या अस्तित्वाला धारण करणारी दिव्यगती म्हणजे व्यासांच्या मते, सुदर्शनचक्र होय. जीवांची घटना नष्ट करणारी ‘अपसव्य’ चक्रगती म्हणजे सर्व अस्तित्व नष्ट करणारे ब्रह्मास्त्र होय. आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता भगवान श्रीविष्णूने व श्रीकृष्णाने याच दिव्य सुदर्शन चक्राचा उपयोग केला आहे. भगवान श्रीविष्णूला पालनकर्ता मानले आहे, ते याच दिव्य गतीमुळे! आता हे साधकांच्या लक्षात आलेच असेल की, सुदर्शनचक्र हे अस्तित्व विश्वातील दिव्य पालनकर्त्या अवस्था व चक्रगती आहे. भगवान वेदव्यासांनी त्या दिव्य अवस्थाशक्तींचे वर्णन आपल्या दिव्य कथारूपात केले आहे. एवढे त्यातील रहस्य जाणून आपणसुद्धा त्याच अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करूया. ‘शिवो भूत्वा शिवं यजेत्’ शिव होण्याकरिताच शिवाची उपासना असते.
भगवान श्रीविष्णूंचे व भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शनाद्वारे आपल्या भक्तांना साहाय्य करणे म्हणजे परम् योग्याने विश्वाच्या अनिष्ट घटना टाळण्याकरिता त्या दिव्य ‘सव्य’गतींचा सुदर्शन रुपाने उपयोग करणे होय. भगवान पातंजल योगसूत्रात स्पष्टच सांगतात - हेयं दुःखम् अनागतम्॥ 16, साधनापाद॥ अनिष्ट घटना टाळण्याकरिता महानयोग्यांना म्हणजेच वेदव्यासांच्या भाषेत श्रीविष्णू, श्रीकृष्णाला दिव्य वैश्विक ‘अपसव्य’ गती बदलून ती सव्य सुदर्शन करावी लागते. अनिष्ट घटना टाळण्यामागे सृष्टीत इतकी सामर्थ्यवान घडामोड करावी लागते, याची कल्पना सामान्यांना नसते. योगी वा भक्तशिरोमणींच्या इच्छेत असलेले, दिव्य सामर्थ्य असते. कारण, ते स्वतः त्या दिव्य ब्रह्मावस्थेला पोहोचलेले असतात. श्रीविष्णूंनी आपल्या सुदर्शनाचा उपयोग अंबरिशराजाला रक्षण देताना दुर्वासांविरुद्ध व गजराजाला सोडवण्याकरिता नक्राच्या विरुद्ध केला, असे व्यासकृत पुराण सांगते. श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शनचक्राचा उपयोग शिशुपालवधाच्या वेळी, जयद्रथवधाच्या वेळी व उत्तरागर्भात असलेल्या परिक्षिताच्या रक्षणाकरिता केला, असे व्यासपुराणच सांगते. सुदर्शनचक्राची दिव्य कल्पना भगवान व्यासांनाच सुचली.
अंबरिश म्हणजे साधकातील विश्वमय असणार्या व्यापक वृत्ती, तर दुर्वास (दु:वास) साधकातीलच असह्य किंवा वाईट अशा वृत्ती. असह्य वृत्ती सुसह्य व व्यापक करण्याकरिता सुदर्शनाचा म्हणजे इष्टधारणागतीचा उपयोग केलाच पाहिजे. नक्र म्हणजे आपतत्त्वाद्वारे प्राप्त झालेल्या गत कर्माच्या आपल्या अनिष्ट वृत्ती होत. असल्या वृत्ती जन्मत: असल्यामुळे त्या साधकाला नक्राप्रमाणे मजबूत धरतात. त्यातून साधक सुटत नाहीत. त्या अनिष्ट आपतत्त्वातील वृत्ती इहजन्मातील गज म्हणजे अतिबलवान अशा चांगल्या वृत्तींना आपल्या जबड्यात पकडून ठेवतात. गजवृत्तीसुद्धा या पूर्ववृत्तीच्या मगरमिठीतून सुटत नसतात. म्हणून असल्या नक्रवृत्तींचा नाश करण्यास घटनाचक्राची ‘अपसव्य’ गती बदलून ‘सव्य’ म्हणजे सुदर्शन करावी लागते. नक्राचा सुदर्शनाने वधकथेत असे दिव्य व्यासरहस्य आहे. या सर्व कथा भगवान वेदव्यासांनीच पुराणात लिहिल्या आहेत. यावरून वेदव्यास किती विशालबुद्धीचे असले पाहिजेत, याची कल्पना येऊ शकेल. शिशुपाल म्हणजे आपल्यातील उच्छृंखल लहरीवृत्ती, ज्या निघता निघत नाहीत, त्यांची मूलघटनाच बदलून त्या साधनायोग्य करण्याकरिता श्रेष्ठ साधकाला असल्या दिव्य
सुदर्शनचक्रगतीचा उपयोग करणे आवश्यक नाही काय? ‘स्वभावो दुरतिक्रमः’ असे जे म्हटले आहे ते किती यथार्थ आहे, हे कळून येईल. मूळ स्वभाव जाईना, अशी प्रत्येकाची अवस्था असते. सवयींना बदलून आपण आपला स्वभाव साधनेयोग्य करू शकतो.
(क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357
योगिराज हरकरे