राज्यातील सर्व बालगृहांमध्ये कोविड नियंत्रण समिती स्थापन करा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Sep-2020
Total Views |
Corona_1  H x W

मानवाधिकार आयोगाचे राज्य सरकारला आदेश


मुंबई : राज्य सरकारने मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या विशेष मुलांसाठी कोविडपासून संरक्षण, उपाययोजना आणि नियंत्रण करणारी समिती स्थापन करावी, याबाबत मानवाधिकार आयोगाने आदेश दिले. भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी याबाबत याचिका दाखल केली होती.


मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष एम. ए. सय्यैद यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नेते सोमय्या यांच्या याचिकेवरील सुनावणी झाली. त्या दरम्यान हे आदेश देण्यात आले आहेत. डॉ. सोमय्या यांनी मानखुर्द येथील बाल सुधारगृहातील ५१ मुलांना कोविडचा संसर्ग झाल्यानंतर मानवाधिकार आयोगाकडे याचिका दाखल केली होती.


बालसुधारगृहातील ३० जणांना संसर्ग झाल्याप्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण न मिळाल्याप्रकरणी आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. एखाद्या बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात येऊन मुलांना संसर्ग झाला असेल, असे कारण रेकॉर्डमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र ते अमान्य आहे. कारण व्यवस्थापनाने मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली होते, असेही आयोगाने स्पष्ट केले.


राज्याच्या मुख्य सचिवांनी या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी महिला व बालविकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, असे मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे. या समितीत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, मानसिक आणि अपंग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, निवारागृहांच्या व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांची या समितीमध्ये नेमणूक करावी. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तयार केलेल्या नियमांच्या आणि सूचनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी आणि कोविडचा संसर्ग होऊ नये म्हणून मुलांच्या सुरक्षिततेबाबतही योग्य ती काटेकोर अंमलबजावणी करता येईल, असे आदेश आयोगातर्फे देण्यात आले.




@@AUTHORINFO_V1@@