नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. ४ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
Read More
(Chiplun and Sangameshwar) कोकणातील चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शुक्रवार दि. २२ फेब्रुवारीला सावर्डेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दोन्ही तालुक्यातील तब्बल आठ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती आहे. यावेळी आमदार शेखर निकम देखील उपस्थित होते.
शिक्षण, समाज आणि साहित्यामधील समरसता यावर लक्ष केंद्रित करून जीवन जगणारे डॉ. गजानन होडे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
पावसाळ्यात धरणात व नदीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत असतानाच आता धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला सर्पाने दंश केल्याने त्याचा मृत्यू होण्याची घटना घडली आहे. चिपळूण येथे मित्रांसोबत आपल्या गावाकडे सहलीसाठी आलेल्या मुंबई-घाटकोपर येथील एका व्यक्तीला कळवंडे धरणात आंघोळ करताना पाण्यातच तीनवेळा सर्पदंश झाला.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-दिल्ली महामार्ग यांसारख्या राज्याच्या आर्थिक राजधानीला विविध शहरांशी वेगवान पद्धतीने जोडणार्या महामार्गांचे पहिले टप्पे प्रवासी वाहतुकीसाठी खुले झाले. पण, मागील एका तपापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम कासवगतीनेच सुरु आहे. तेव्हा, एकूणच मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रकल्प रखडण्यामागची कारणे आणि हा महामार्ग कधी पूर्णत्वास येईल, यासंबंधी आढावा घेणारा हा लेख...