शाहीर मधुकर नेराळे यांचं सोमवारी निधन झालं. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचं खूप मोठं नुकसान झालंय. कोण होते हे मधुकर नेराळे ( Madhukar Nerale ) आणि काय होतं त्यांचं कलाक्षेत्रातील योगदान जाणून घेऊया या व्हिडिओतून
Read More
नेरळ : नेरळ कुंभार आळी येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ खेळत असलेला मनीष धर्मेश पाटील ( Manish Patil ) हा अल्पवयीन मुलगा हरवलेला चेंडू शोधण्यासाठी गेला आणि उघड्या डीपीला जाऊन धडकल्याने त्याला शॉक लागून तो तेथेच चिकटला. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्याची कशीबशी सोडवणूक केल्याने मोठा अनर्थ टळला.
मध्य रेल्वेने नेरळ ते अमन लॉज मिनीट्रेन सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या सुरू राहणार आहेत.
भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ-माथेरान रेल्वेने १९०७ मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेन सेवेने गौरवशाली ११६ वर्षे पूर्ण केली आहेत. या ट्रेनचा इतिहास पाहता डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे.
कर्जतमधील नेरळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान एका युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संतप्त वातावरण आहे. याविरोधात शनिवारी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र ही फक्त शूरांचीच भूमी नसून, येथे अनेकानेक इतर गोष्टीही पाहायला मिळतात. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक तीर्थक्षेत्र आहेत. त्यात प्रामुख्याने भगवान शंकराची मंदिरे जवळपास सर्वच गावात आढळतात. असे असले तरी त्यातील काही मंदिरंही सर्वार्थाने नेहमीच विशेष असतात. रायगड जिल्ह्यातील नेरळ गावात स्थित असणार्या अशाच एका मंदिराबद्दल आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
हरिभाऊ भडसावळे उर्फ काका भडसावळे यांनी १९४७ मध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमा पाटील यांच्या स्मरणार्थ कोतवाल वाडी ट्रस्टची स्थापना केली.