मुंबई (Nitin Nabin first Mumbai visit) : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर बुधवार, दि.१६ सप्टेंबर रोजी प्रथमच मुंबईचा दौरा केला. गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात तसेच प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेतले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत उपस्थित होते. (Nitin Nabin first Mumbai visit)
मुंबईत आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीन नबीन यांचे स्वागत केले. गणेशोत्सवानिमित्त दिलेले निमंत्रण स्वीकारून मुंबईत आल्याबद्दल त्यांनी नबीन यांचे आभार मानले. यावेळी विमानतळावर भाजपा राष्ट्रीय सह संघटन महामंत्री शिवप्रकाशजी, मंत्री ॲड.आशिष शेलार आणि मंत्री जयकुमार रावल, महापौर रितू तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे मोठ्या उत्साहात साजरे होणारे सांस्कृतिक उत्सव असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नबीन यांच्या मुंबई दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्ते तसेच गणेशभक्तांमध्ये उत्साह वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. (Nitin Nabin first Mumbai visit)
यावेळी नितीन नबीन यांच्या संघटनात्मक कार्याचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, विकसित भारताच्या दिशेने देशाला घेऊन जाणारा भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. नितीन नबीन हे नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व असून, भाजपच्या संघटनेत आलेल्या नवचैतन्याचे ते प्रतीक आहेत. (Nitin Nabin first Mumbai visit)
नबीन हे बिहारमधून चार वेळा सातत्याने आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे राज्यात काम केले असून, महाराष्ट्रातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा जवळचा परिचय असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते आणि त्यांनी ते स्वीकारल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. (Nitin Nabin first Mumbai visit)
दरम्यान, महाराष्ट्रातील आपल्या पहिल्या दौऱ्याबद्दल नितीन नबीन यांनीही भावना व्यक्त केल्या. “महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझे हे पहिले आगमन आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात गणेशोत्सव साजरा होत असताना येथे येणे हा माझ्यासाठी सौभाग्याचा क्षण आहे,” असे त्यांनी सांगितले. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण पुढे वाटचाल करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत योग्य दिशेने मजबुतीने पुढे जात आहे,” असेही नबीन यांनी नमूद केले. गणेशोत्सवाच्या या पावन पर्वात त्यांनी देश आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाप्पाकडे प्रार्थना केली. (Nitin Nabin first Mumbai visit)
सिद्धिविनायक गणेश मंदिर आणि लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर नितीन नबीन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच मंत्री पंकजा मुंडे यांच्याही निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी देखील भेट दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही भेट दिली. (Nitin Nabin first Mumbai visit)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.