बदलापूरच्या ६०० टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला गतीप्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण

अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगरच्या कचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी दिशा


Badlapur Waste Processing Project 
 
मुंबई (Badlapur Waste Processing Project) : अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांमधील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बदलापूर येथे उभारण्यात येत असलेल्या एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे ६० टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. दररोज ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे तीनही शहरांच्या कचरा व्यवस्थापनाला दीर्घकालीन आधार मिळणार आहे. (Badlapur Waste Processing Project)
 
जर्मनीच्या केएफडब्ल्यू विकास बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या महानगर प्रदेश नागरी पायाभूत सुविधा सुधारणा कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प उभारला जात आहे. कचरा निर्मिती कमी करणे, कचऱ्यातील पुनर्वापरयोग्य घटक वेगळे करणे आणि उर्वरित कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे, या तत्त्वांवर प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. (Badlapur Waste Processing Project)
 
प्रकल्पामध्ये कागद, प्लास्टिक, धातू आणि काच यांसारख्या पुनर्वापरयोग्य वस्तू वेगळ्या करण्यासाठी स्वतंत्र सुविधा असणार आहे. जैवविघटनशील कचऱ्यावर स्वतंत्र प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. तसेच उर्वरित योग्य कचऱ्यापासून इंधननिर्मितीसाठी उपयुक्त पदार्थ तयार करण्यात येणार आहेत. प्रक्रिया केल्यानंतर उर्वरित कचऱ्यासाठी शास्त्रोक्त भरावभूमीची सुविधाही उभारण्यात येणार आहे. (Badlapur Waste Processing Project)
 
प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण आणि भरावभूमीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी दुर्गंधी, रोगवाहक कीटकांचा प्रादुर्भाव आणि कचऱ्याला आग लागण्याचे धोके कमी होण्याची अपेक्षा आहे. जैवविघटनशील कचऱ्यावर योग्य प्रक्रिया केल्यामुळे पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करण्यास मदत होणार आहे. कचऱ्यातील उपयुक्त घटकांचा पुनर्वापर झाल्याने नैसर्गिक संसाधनांवरील ताणही कमी होणार आहे. (Badlapur Waste Processing Project)
 
प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी एमएमआरडीएकडून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, केएफडब्ल्यू विकास बँक, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, कंत्राटदार आणि संबंधित शासकीय यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. प्रकल्पाच्या प्रगतीचा नियमित आढावा, जागेचा विकास, आवश्यक मंजुऱ्या, जुन्या कचऱ्याचे निर्मूलन, नियंत्रित स्फोटकाम, पूरक पायाभूत सुविधांची उभारणी आणि यंत्रसामग्रीची उभारणी यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. (Badlapur Waste Processing Project)
 
६०० टन - दररोज कचरा प्रक्रिया क्षमता
 
६० टक्के - प्रकल्पाचे भौतिक काम पूर्ण
 
३ शहरे - अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगर
 
पुनर्वापर - कागद, प्लास्टिक, धातू व काचेची पुनर्प्राप्ती
 
सेंद्रिय खत व इंधननिर्मिती- कचऱ्याचा अधिकाधिक उपयोग
 
 (Badlapur Waste Processing Project)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर