फाइव्ह स्टार हॉटेलांना पार्किंगमध्ये ५० टक्के सूट देण्यास नगरसेवकांचा विरोध

सुधार समितीने प्रस्ताव फेटाळला; वर्सोव्यात अग्निशमन केंद्राचे आरक्षणही कायम

    11-Sep-2026
 

Corporators oppose parking for five-star hotels.
 
मुंबई : विमानतळ परिसरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातील फाइव्ह स्टार हॉटेलांना आवश्यक पार्किंगमध्ये ५० टक्के सूट देण्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळून लावला. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. तसेच वर्सोव्यात अग्निशमन केंद्राची गरज नसल्याचे सांगत आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावालाही विरोध करण्यात आला.(Corporators oppose parking for five-star hotels)
 
महापालिकेच्या विद्यमान नियमांनुसार हॉटेलच्या एकूण बांधकाम क्षेत्रानुसार पार्किंगची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मात्र, हॉटेलच्या एकूण क्षेत्रात लॉबी, कॉरिडॉर, स्वयंपाकघर, स्टोरेज आदी भागांचाही समावेश होतो. या ठिकाणी वाहनांची ये-जा होत नसल्याने पार्किंगच्या जागेत ५० टक्के सूट देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला होता.(Corporators oppose parking for five-star hotels)
 
कोणत्या हॉटेलच्या फायद्यासाठी प्रस्ताव?
प्रस्तावावरील चर्चेदरम्यान नगरसेवक सचिन पडवाल यांनी पार्किंगच्या नियमांमध्ये एवढी मोठी सूट देण्यामागचे कारण विचारले. पार्किंगसाठी लागणारी जागा कमी झाल्यानंतर उरणारी जागा हॉटेलच्या इतर वापरासाठी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट हॉटेलला किंवा खासगी प्रकल्पाला फायदा करून देण्यासाठी हा प्रस्ताव आणला आहे का, असा सवाल त्यांनी केला. (Corporators oppose parking for five-star hotels)
 
काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आजमी यांनीही या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केले. पार्किंगची गरज ५० टक्क्यांनी कमी केली जात असेल, तर प्रत्यक्षात किती पार्किंगची आवश्यकता आहे, हे स्पष्ट केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
 
भाजपसह शिवसेना आणि इतर पक्षांच्या नगरसेवकांनीही या प्रस्तावाला विरोध केला. अखेर सुधार समितीच्या अध्यक्ष संध्या दोषी यांनी प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला. (Corporators oppose parking for five-star hotels)
 
वर्सोव्यात अग्निशमन केंद्राची गरज नसल्याच्या निर्णयाला विरोध
 
दरम्यान, वर्सोव्यातील म्हाडाच्या एका भूखंडावर अग्निशमन केंद्रासाठी आरक्षण होते. मात्र, या ठिकाणी अग्निशमन केंद्राची गरज नसल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले होते. त्यानंतर हे आरक्षण रद्द करून बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
 
याशिवाय, या ठिकाणी महापालिकेच्या चौकीचीही गरज नसल्याचे सांगत भूखंडाचे आरक्षण गृहनिर्माणासाठी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. (Corporators oppose parking for five-star hotels)
 
भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी वर्सोवासारख्या भागात अग्निशमन केंद्राची गरज नसल्याचे कसे सांगितले जाऊ शकते, असा सवाल केला. त्यांनी संबंधित अग्निशमन अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
भाजपचे नगरसेवक दिलीप पटेल यांनीही या प्रस्तावाला विरोध करत तो रद्द करण्याची मागणी केली. अखेर सुधार समितीने अग्निशमन विभाग आणि महापालिका प्रशासनाचा हा प्रस्तावही फेटाळून लावला. (Corporators oppose parking for five-star hotels)




संबंधित मजकूर