ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६मध्ये बँक ऑफ इंडियाचे १२ डिजिटल बँकिंग उपक्रम सुरू

    11-Sep-2026

मुंबई : (Bank of India Digital Banking Initiatives) बँक ऑफ इंडियाने ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) २०२६मध्ये आपल्या डिजिटल क्षमतांचे प्रदर्शन केले. पेमेंट्स, कार्ड्स, डिजिटल करन्सी, सेल्फ-सर्व्हिस बँकिंग, अनुपालन, ग्राहक सहभाग आणि फिनटेक सहकार्य अशा विविध क्षेत्रांत बँकेने १२ डिजिटल उपक्रम सुरू केले.

बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक, बँकेचे वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार आणि फिनटेक कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बँकेच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. (Bank of India Digital Banking Initiatives)

हे उपक्रम बँकिंग सेवा अधिक सोप्या, सुरक्षित, सर्वसमावेशक आणि सुलभ करण्याच्या बँकेच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, एजंटिक कॉमर्स, प्रोग्रामेबल डिजिटल करन्सी आणि डेटा-आधारित ग्राहक सहभाग यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानावरही बँकेने भर दिला आहे. (Bank of India Digital Banking Initiatives)

ओम्नी निओमध्ये यूपीआय हेल्प २.०

बँक ऑफ इंडियाने डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात यूपीआय हेल्प २.० सादर केले. या सुविधेद्वारे ग्राहकांना यूपीआय व्यवहारांचा इतिहास पाहता येणार आहे. तसेच तक्रारी नोंदवणे, त्यांचा मागोवा घेणे आणि बँक ऑफ इंडियाच्या खात्यांशी संबंधित यूपीआय मँडेट्स व्यवस्थापित करणे शक्य होणार आहे. (Bank of India Digital Banking Initiatives)

ही सुविधा बँकेच्या ओम्नी निओ मोबाइल अॅपमध्ये समाकलित करण्यात आली आहे. कोणत्याही यूपीआय अॅपद्वारे तयार केलेले मँडेट्स बँक ऑफ इंडियाच्या खात्याशी संबंधित असल्यास ग्राहकांना ते ओम्नी निओ अॅपमधून पाहता आणि व्यवस्थापित करता येतील. (Bank of India Digital Banking Initiatives)

यूपीआय हेल्प २.०मध्ये ‘ट्रान्झॅक्शन रिप्ले’ सुविधेचाही समावेश आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना यापूर्वी केलेला यूपीआय व्यवहार पुन्हा सुरू करता येणार आहे. (Bank of India Digital Banking Initiatives)

यूपीआय टॅप अँड पे सुविधा

बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी यूपीआय टॅप अँड पे ऑन पीओएस सुविधा सुरू केली आहे. एनएफसी-सक्षम स्मार्टफोन समर्थित पीओएस टर्मिनलवर टॅप करून ग्राहक कॉन्टॅक्टलेस यूपीआय पेमेंट करू शकतील. (Bank of India Digital Banking Initiatives)

ओम्नी निओ अॅपमध्ये ही सुविधा सुरू करून ग्राहक ते टॅप अँड पे व्यवहारांसाठी डीफॉल्ट अॅप म्हणून निवडू शकतात. ५,००० रुपयांपेक्षा कमी रकमेच्या खरेदीवेळी व्यापाऱ्याकडून यूपीआय कलेक्ट रिक्वेस्ट सुरू केली जाईल. त्यानंतर पीओएस मशीनवर फोन टॅप केल्यावर व्यवहार पूर्ण होईल. (Bank of India Digital Banking Initiatives)

तिकीट बुकिंग आणि एआय-आधारित पेमेंट्स एनपीसीआय भारत बिलपे लिमिटेडने विकसित केलेल्या युनिफाइड तिकीट प्लॅटफॉर्मचेही बँकेने प्रदर्शन केले. सहभागी वाहतूक आणि पर्यटन सेवा प्रदाते या प्लॅटफॉर्मशी जोडले गेल्यानंतर ग्राहकांना ओम्नी निओ अॅपद्वारे मेट्रो, बस आणि पर्यटनस्थळांची तिकिटे बुक करता येतील. (Bank of India Digital Banking Initiatives)

बँक ऑफ इंडियाने यूपीआय आणि रुपे कार्ड्ससाठी कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित पेमेंट सोल्यूशन्सही सादर केले. ग्राहकाने पडताळणी आणि अधिकृतता दिल्यानंतर एआय एजंट बिल भरणे, सबस्क्रिप्शनचे नूतनीकरण किंवा लहान खरेदी यांसारखी कामे स्वयंचलितपणे करू शकतो. ग्राहकांना ही परवानगी कधीही बदलता किंवा रद्द करता येईल. (Bank of India Digital Banking Initiatives)

आयएमपीएस बल्क पेमेंट सुविधा

एनपीसीआयच्या सहकार्याने बँक ऑफ इंडियाने आयएमपीएस बल्क पेमेंट सुविधा सुरू केली. या सुविधेद्वारे ग्राहक मोठ्या संख्येने पेमेंट रिक्वेस्ट एकाच वेळी पाठवू शकतात. व्यवहारांवर प्रक्रिया झाल्यानंतर ग्राहकांना एकत्रित रिस्पॉन्स फाइल उपलब्ध होईल. (Bank of India Digital Banking Initiatives)

ही सुविधा विशेषतः कॉर्पोरेट ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंगद्वारे उपयुक्त ठरणार आहे. हे सोल्यूशन बँकेच्या सेंट्रलाइज्ड डिजिटल पेमेंट स्विचवर विकसित करण्यात आले आहे. (Bank of India Digital Banking Initiatives)

उद्देश-आधारित व्यवहारांसाठी प्रोग्रामेबल सीबीडीसी

डिजिटल करन्सी क्षेत्रात बँक ऑफ इंडियाने युजर-लेव्हल प्रोग्रामेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) सुविधा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे डिजिटल टोकन्समध्ये व्यापाऱ्याची श्रेणी, भौगोलिक मर्यादा, कालबाह्यता कालावधी आणि स्वीकाराचे निकष यांसारख्या अटी समाविष्ट करता येतात. व्यवहार ठरवलेल्या अटींनुसार होत आहेत की नाही, याची रिअल-टाइम तपासणी केली जाते. (Bank of India Digital Banking Initiatives)

लक्ष्यित अनुदाने, मदत निधी, उद्देश-आधारित लाभ आणि विविध थेट लाभ हस्तांतरण योजनांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. यामुळे निधी ज्या उद्देशासाठी देण्यात आला आहे, त्याच कारणासाठी वापरला जात असल्याची खात्री करण्यास मदत होऊ शकते. (Bank of India Digital Banking Initiatives)


टेरा मास्टरकार्ड वर्ल्ड क्रेडिट कार्ड

GFF २०२६मध्ये बँक ऑफ इंडियाने टेरा मास्टरकार्ड वर्ल्ड क्रेडिट कार्ड सादर केले. हे कॉन्टॅक्टलेस इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड असून प्रीमियम प्रवास, लाइफस्टाइल आणि जागतिक पेमेंट सुविधांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ते डिझाइन करण्यात आले आहे. (Bank of India Digital Banking Initiatives)

हे कार्ड एटीएम, पीओएस टर्मिनल्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वापरता येईल. प्रवास, मनोरंजन, डायनिंग, मोबिलिटी, वेलनेस आणि डिजिटल सबस्क्रिप्शनसाठी विविध लाभ उपलब्ध असतील. यामध्ये विमानतळ लाउंज प्रवेश, रिवॉर्ड पॉइंट्स आणि विविध ब्रँड्सच्या ऑफर्सचा समावेश आहे. (Bank of India Digital Banking Initiatives)

या कार्डासाठी कोणतेही इश्यूअन्स शुल्क आकारले जाणार नाही. मुख्य कार्डासाठी वार्षिक सदस्यत्व शुल्क ९९० रुपये, तर अॅड-ऑन कार्डासाठी ७५० रुपये असेल. (Bank of India Digital Banking Initiatives)

फिनटेक भागीदारांसाठी पोर्टल

बँकेने युनिफाइड एजंटनेक्स्ट पार्टनर इंटिग्रेशनही सुरू केले. यामुळे विविध मान्यताप्राप्त तंत्रज्ञान सेवा प्रदात्यांशी एकाच फ्रेमवर्कद्वारे संपर्क आणि व्यवस्थापन करणे शक्य होईल. (Bank of India Digital Banking Initiatives)

फिनटेक कंपन्यांसाठी बँकेने फिनटेक कनेक्ट पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे कंपन्यांना आपली क्षमता नोंदवून बँकेसमोर प्रस्ताव सादर करता येतील. प्रत्येक प्रस्तावाचे गुणवत्तेच्या आधारावर मूल्यांकन केले जाईल. फिनटेक भागीदारांचा केंद्रीकृत डेटाबेस तयार करणे आणि संभाव्य भागीदारांशी संवाद अधिक पारदर्शक व संरचित करणे हा या पोर्टलचा उद्देश आहे. (Bank of India Digital Banking Initiatives)



नेक्स्ट जनरेशन सेल्फ-सर्व्हिस बँकिंग

हिटाचीच्या सहकार्याने बँक ऑफ इंडियाने अँड्रॉइड-आधारित कॅश रिसायकलर मशीनचे प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट सादर केले. या मशीनद्वारे एटीएम आणि कॅश रिसायकलर सुविधांसोबत यूपीआय-आधारित कार्डलेस कॅश विथड्रॉवल, ग्रीन पिन निर्मिती आणि रिअल-टाइम डेबिट कार्ड जारी करण्याची सुविधा मिळू शकते. (Bank of India Digital Banking Initiatives)

अनुपालन आणि ग्राहक सहभागासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

एएल्फा प्लस हे तंत्रज्ञान-सक्षम अनुपालन प्लॅटफॉर्म बँकेने सादर केले. नियामक तपासणी व्यवस्थापन, पत्रव्यवहाराचा मागोवा, अनुपालन सल्ला, परिपत्रक संग्रह व्यवस्थापन, त्रुटी अहवाल आणि दंडाचा मागोवा यांसारख्या प्रक्रियांचे ऑटोमेशन या प्लॅटफॉर्मद्वारे करता येईल. (Bank of India Digital Banking Initiatives)

बँकेने मार्केटिक्स प्लॅटफॉर्मचेही प्रदर्शन केले. ग्राहकांच्या भेटींचा मागोवा, उत्पादनांची माहिती, लीड जनरेशन, सत्र बुकिंग, फीडबॅक आणि रिवॉर्ड्स व्यवस्थापन यांसारख्या सुविधा या प्लॅटफॉर्ममध्ये आहेत. (Bank of India Digital Banking Initiatives)

याशिवाय टोनटॅग-सक्षम ई-कोशा २.० हे संभाषणात्मक बँकिंग सोल्यूशनही सादर करण्यात आले. याद्वारे ग्राहकांना आवाजाच्या माध्यमातून बँकेशी संवाद साधता येईल आणि बँकिंगविषयक माहिती व सेवांपर्यंत पोहोचता येईल. (Bank of India Digital Banking Initiatives)


वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चर्चासत्रांमध्ये सहभाग

बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कृत्रिम बुद्धिमत्ता, क्रेडिट, अनुपालन, सायबरसुरक्षा, ऑपरेशनल रिझिलियन्स आणि आंतरराष्ट्रीय फिनटेक सहकार्याच्या भविष्यावर आधारित विविध चर्चांमध्ये सहभाग घेतला. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक यांनी ‘एंड-टू-एंड एआय इन क्रेडिट’ या सत्रात सहभाग घेतला.

बँकेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एआय-आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टीम, बँकिंगमधील हायपरपर्सनलायझेशन, रिस्पॉन्सिबल एआय, ऑटोनॉमस बँकिंग, इंडिया-यूके फिनटेक कॉरिडॉर आणि सायबरसुरक्षा यांसारख्या विषयांवरील चर्चांमध्ये सहभाग घेतला. (Bank of India Digital Banking Initiatives)








संबंधित मजकूर