डोंबिवली (Swarajya Dahikala Utsav Dombivli) : डोंबिवली पश्चिम येथील सम्राट अशोक चौक येथे दिपेश म्हात्रे फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या डोंबिवलीतील भव्य ‘स्वराज्य दहीकाला उत्सवा’चे निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना भाजपा नगरसेवक तथा उत्सव आयोजक दिपेश म्हात्रे यांनी दिले आहे. (Swarajya Dahikala Utsav Dombivli)
डोंबिवलीतील मोठ्या आणि भव्य दहीहंडी उत्सवांपैकी एक म्हणून ‘स्वराज्य दहीकाला उत्सवा’ची ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो. यंदाही नागरिक, गोविंदा पथके आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने हा उत्सव भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.(Swarajya Dahikala Utsav Dombivli)
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना कार्यक्रमाचे विशेष निमंत्रण देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘स्वराज्य दहीकाला उत्सवा’ला नक्की उपस्थित राहतील, अशी अपेक्षा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या उपस्थितीने डोंबिवलीतील गोविंदा पथके, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्साह निश्चितच द्विगुणित होईल असे म्हात्रे यांनी सांगितले. (Swarajya Dahikala Utsav Dombivli)
‘स्वराज्य दहीकाला उत्सव’ हा केवळ दहीहंडीचा कार्यक्रम नसून डोंबिवलीकरांच्या एकजुटीचा, परंपरेचा, संस्कृतीचा आणि उत्साहाचा भव्य सोहळा आहे असे म्हात्रे यांनी सांगितले. (Swarajya Dahikala Utsav Dombivli)