बिश्केक,(PM Modi SCO Summit Terrorism) : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या २६व्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका ठामपणे मांडली. मंगळवारी किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे झालेल्या परिषदेत मोदी यांनी दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकजुटीने आणि एकाच आवाजात भूमिका घेण्याचे आवाहन केले. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर ‘डबल स्टँडर्ड’ स्वीकारता येणार नसल्याचे स्पष्ट शब्दात बजावले. (PM Modi SCO Summit Terrorism)
जागतिक संघर्षांबाबतही पंतप्रधान म्हणाले की, ”युद्ध किंवा संघर्षातून प्रश्न सुटत नाहीत, तर संवाद आणि राजनयाच्या माध्यमातूनच त्यावर तोडगा काढला पाहिजे. जगभरातील युद्धे आणि संघर्ष संवाद व मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवण्याची गरज आहे. एससीओ देशांमधील कनेटिव्हिटी प्रकल्पांबाबत पंतप्रधान मोदी यांनी हे प्रकल्प सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणारे असावेत, असे स्पष्ट केले. (PM Modi SCO Summit Terrorism)
एससीओला २५ वर्षे पूर्ण
यंदाची शिखर परिषद विशेष महत्त्वाची आहे. या संघटनेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २००१ मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी मिळून एससीओची स्थापना केली. भारत आणि पाकिस्तान २०१७ मध्ये पूर्ण सदस्य झाले. त्यानंतर २०२३ मध्ये इराण आणि २०२४ मध्ये बेलारूस या संघटनेचे पूर्ण सदस्य झाले. सध्या संघटनेत १० सदस्य देश आहेत. (PM Modi SCO Summit Terrorism)
दहशतवादाच्या संपूर्ण यंत्रणेचा नायनाट करा
’दहशतवादाला केवळ हिंसक कारवायांपुरते मर्यादित न ठेवता त्यामागील संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. दहशतवादाला मिळणारा आर्थिक पुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने यांच्याविरोधात एकत्रितपणे कारवाई करावी लागणार आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतेही दुहेरी निकष न ठेवता सर्व देशांनी एकाच आवाजात भूमिका मांडली पाहिजे.(PM Modi SCO Summit Terrorism)