सार्वजनिक निधीचा अनावश्यक वापर नको; लोककल्याणाला प्राधान्य द्या !

मुख्यमंत्र्यांनीच टोचले महापालिका प्रशासनाचे कान


Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात आली होती. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी जाहीर केली आहे. सार्वजनिक निधीचा अनावश्यक वापर टाळून विकासकामे आणि जनकल्याणाच्या योजनांना प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.(Devendra Fadnavis)
 
दि.३० जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच तीन प्रमुख समित्यांच्या अध्यक्षांसाठी नवीन टोयोटा इनोव्हा क्रिस्टा वाहने भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, महापालिकेच्या आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावावर विरोधकांनी आक्षेप घेत सार्वजनिक पैशांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले.(Devendra Fadnavis)
 
यावर भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी प्रत्युत्तर देताना, हा प्रस्ताव सर्व पक्षांच्या प्रतिनिधींच्या चर्चेनंतरच पुढे आला होता, असा दावा केला. भविष्यात अशा प्रस्तावांना मंजुरी देताना सर्व पक्षांच्या नेत्यांच्या लेखी संमतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असेही त्यांनी सुचविले. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही विरोधकांवर टीका करत बैठकीत प्रस्तावाची संपूर्ण माहिती सर्व सदस्यांना देण्यात आली होती आणि त्यावेळी कोणताही ठोस विरोध नोंदविण्यात आला नव्हता, असा दावा केला.(Devendra Fadnavis)
 
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर नाराजी जाहीर केल्याची सूत्रांची माहिती आहे. जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा. उधळपट्टी थांबवा ; जनतेच्या कामांवर लक्ष्य केंद्रीत करा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे सार्वजनिक निधीच्या वापराबाबत पुन्हा एकदा काटेकोर आर्थिक शिस्त आणि लोककल्याणाला प्राधान्य देण्याचा संदेश प्रशासनाला मिळाल्याचे मानले जात आहे.(Devendra Fadnavis)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर