मुंबई : (BEST Electric Bus) बेस्टच्या ताफ्यात १५० डबल डेकर वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल करण्याच्या मार्गातील अडथळा अखेर बुधवारी दूर झाला. कंत्राटदाराला अतिरिक्त पैसे देण्याची तयारी बेस्ट समितीने दर्शविल्यानंतर या बस आता बेस्टच्या ताफ्यात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेस्ट प्रशासनाने २०० डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कंत्राटदाराने ५० बस उपलब्ध करून दिल्यानंतर बसच्या किमतीत झालेली वाढ तसेच इलेक्ट्रिक बसमध्ये नवीन पार्ट्स बसविण्याचे निर्देश देण्यात आल्याने उर्वरित बस देण्यास नकार दिला होता. बेस्ट प्रशासनाने कंत्राटदाराला प्रतिकिलोमीटर २.८७ रुपये दराने बस उपलब्ध करून देण्याचे कंत्राट दिले होते. मात्र, इलेक्ट्रिक बसमधील चिपच्या किमतीत वाढ झाल्याने आता प्रतिकिलोमीटर ३.८५ रुपये या नव्या दराने बस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. (BEST Electric Bus)
बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत १५० डबल डेकर वातानुकूलित इलेक्ट्रिक बस खरेदीच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आगामी काळात मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. (BEST Electric Bus)
पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज बस
नवीन डबल डेकर इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक असणार आहेत. या बसच्या वापरामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. बसच्या दोन्ही बाजूंना स्वयंचलित प्रवेशद्वार असतील. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढणे आणि उतरणे अधिक सोयीचे होणार आहे. (BEST Electric Bus)
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी मोबाइल चार्जिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (BEST Electric Bus)
काही बस ‘ओपन डेक’ स्वरूपात
बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी १५० बसपैकी काही बस ‘ओपन डेक’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मुंबई दर्शन आणि पर्यटनासाठी बेस्टच्या बससेवेला नवे स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. (BEST Electric Bus)