'वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनाला विरोध व्होटबँकेला खूष करण्यासाठीचमौलाना साजिद रशीदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

    17-Aug-2026   

 
Vande Mataram Congress
 
मुंबई (Vande Mataram Congress): ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशीदी यांनी ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गायनाला विरोध करते, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’ गायनावरून निर्माण झालेल्या वादावर रशीदी यांनी स्पष्टपणे सांगितले की, काँग्रेसने हे आपल्या वोटबँकेसाठी केले आहे. मुस्लिमांना खूश करण्यासाठी काँग्रेसने अशी भूमिका घेतल्याचा दावा त्यांनी केला. (Vande Mataram Congress)
 

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्लाम धर्मियांच्या भावना समजून घेतात. त्यांनी मुस्लिम मुलांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात लॅपटॉप पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. या भावना प्रत्येकामध्ये असल्या पाहिजेत. काँग्रेसच्या राजवटीत मुस्लिम सुरक्षित नव्हते. मुस्लिम सुरक्षित असते तर त्यांनी प्रगती केली असती, पुढे गेले असते, आयएएस आणि आयपीएस अधिकारी झाले असते, नोकऱ्यांमध्ये सहभागी झाले असते आणि संसद तसेच राज्य विधानसभांमध्ये पोहोचले असते. मुस्लिमांचा वापर करून त्यांना केवळ मतपेढी म्हणून पाहण्यात आले, असा दावा मौलाना साजिद रशीदी यांनी केला.(Vande Mataram Congress)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर