रे रोड रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या खर्चात आणखी २३.०५ कोटींची वाढ

पूर्ण झालेल्या प्रकल्पासाठी अतिरिक्त मंजुरीचा प्रस्ताव

    08-Jul-2026
Reay Road Bridge Cost
 
मुंबई : (Reay Road Bridge Cost) गेल्या वर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या रे रोड येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल (आरओबी) प्रकल्पाच्या खर्चात २३ कोटी ५ लाख १० हजार ५५१.५४ रुपये अतिरिक्त वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. हा पूल १३ मे २०२५ रोजी सुरू झाला असला तरी, प्रकल्पादरम्यान झालेल्या अतिरिक्त आणि जादा कामांसाठी आता खर्चवाढीस मंजुरी मागण्यात आली आहे.(Reay Road Bridge Cost)
 
प्रस्तावानुसार, या प्रकल्पासाठी २०२२ मध्ये १९०.०७ कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. कामादरम्यान रेल्वे प्रशासनाच्या सूचनांनुसार आराखड्यात बदल, पादचारी मार्गाची लांबी वाढविणे, विविध युटिलिटीजचे स्थलांतर, अतिरिक्त पाया, स्टील व काँक्रीटची कामे आणि इतर तांत्रिक बदल करण्यात आले. त्यामुळे २५.८३ कोटी रुपयांची जादा कामे आणि ९.२४ कोटी रुपयांची अतिरिक्त कामे झाली. बचत आणि करारातील समायोजन वजा केल्यानंतर २३.०५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.(Reay Road Bridge Cost)
 
या खर्चवाढीस प्रशासकीय मान्यता देऊन एमआरआयडीसीएलसोबतच्या करारात आवश्यक सुधारणा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. मूळ मंजुरीनंतर प्रकल्पाच्या खर्चात २३ कोटी रुपयांहून अधिक वाढ झाल्याने या खर्चवाढीमागील कारणांची सखोल छाननी करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.(Reay Road Bridge Cost)
 
 




संबंधित मजकूर