२०१९ ला राजकीय धर्मांतर केले नसते उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती!- मंत्री नितेश राणेंचा टोला

महाराष्ट्रातील अभिषेक बॅनर्जीमुळे उबाठा गट रिकामा होणार

 
Sachin Ahir Joins Shinde Camp
 
मुंबई : (Sachin Ahir Joins Shinde Camp) विधान परिषदेतील उपसभापतीपदी सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून अर्ज दाखल केल्यांनतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर जोरदार टीका करत, पक्षातील घडामोडींसाठी उद्धव ठाकरे यांनाच जबाबदार धरले.
 
माध्यमांशी बोलतांना मंत्री नितेश राणे म्हणाले, "सचिन आहेरजी हा काय छोटा माणूस नाही. महाराष्ट्राच्या अभिषेक बॅनर्जी मुळे उबाठा पूर्ण खाली होणार आहे.पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खाली झाले त्याचे मूळ कारणच अभिषेक बॅनर्जी होता. तसेच, महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पण एक अभिषेक बॅनर्जी आहे त्याच्यामुळे उबाठा खाली होत आहे".
 
आदित्य ठाकरेना आव्हान देताना नितेश राणे म्हणाले, "आता आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन परत निवडून येऊन दाखवावं. कारण सचिन आहिर, सुनील शिंदे यांच्यामुळेच तर हे सभागृहामध्ये बसतात आणि टोमणे मारतात. आता एक सभा वरळीमध्ये पण घ्यावी. मुळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या घरातल्या लोकांचा जो मूळ स्वभाव आहे ना त्याच्यामुळे ही पडझड होते आहे. जी लोक सोडून जात आहेत ती लोक साधी लोक नाहीत. त्यांच्या पक्षात मातोश्रीमध्ये आजच्या काळात जस वागवले जाते आहे त्यामुळे हे होते आहे. अरे जो बाळासाहेबांचा झाला नाही तो या आमदारांचा, खासदारांच्या आणि शिवसेनेच्या सहकाऱ्यांचा काय होणार?", असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. (Sachin Ahir Joins Shinde Camp)
 
"जो आपल्या वडिलांचा झाला नाही, जो आमच्या देवेंद्रजींचा झाला नाही. आता देवेंद्रजींना आम्ही प्रधानमंत्री करणार असे बोलत आहेत. हिंदुत्वाच्या विरोधात गेल्यानंतर स्वतःच्या धर्माच्या विरोधात गेल्यानंतर देवी देवतांच्या विरोधात गेल्यानंतर आता भोगा पाप. हे त्याच्या स्वतःचेच कर्म आहे. पहिले गणेश नाईक साहेब, मग राणे साहेब, मग राज साहेब, मग एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या काळात पक्ष सोडून गेले. आम्ही जुने शिवसैनिक आहोत. (Sachin Ahir Joins Shinde Camp)
 
मग एकनाथ शिंदे साहेब मग आता हे लाईनीत एवढे सगळे लोक फक्त एका उद्धव ठाकरेंच्या विरोधात जात असतील म्हणजे या सगळ्या लोकांचा कॉमन फॅक्टर उद्धव ठाकरे आहे. उद्धव ठाकरेंनी गपचूप घरी बसावं, कुठेतरी वृद्धाश्रमात जाऊन बसावे. बाळासाहेबांना त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये जो त्रास, छळ केला त्याचे भोगणार आहे. आमच्या राणे साहेबांसारख्या जेवणाच्या ताटावरून उचलले त्याचे तो भोगणार आहे. तुझ्या मुलाचं भविष्य किती अंधारात तू टाकलं तरी विचार करा", असेही मंत्री राणे म्हणाले. (Sachin Ahir Joins Shinde Camp)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर