ठाकरेंना धक्का, सचिन अहिरांनी उपसभापतीपदाचा भरला अर्ज; शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार

    30-Jun-2026   

मुंबई: (Sachin Ahir) उबाठा गटाचे विधानपरिषद आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे शिलेदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज भरला आहे. उद्धव ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Sachin Ahir)

तसेच सचिन अहिर हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही समजते. उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट, आमदार कृपाल तुमाने, मनिषा कायंदे, दुष्यंत चतुर्वेदी, चंद्रकांत रघुवंशी आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. (Sachin Ahir)

दुसरीकडे, उबाठा गटानेही उपसभापती पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरेंना दिलेला हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सचिन अहिर हे आदित्य ठाकरेंचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जातात. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेतील विजयात सचिन अहिर यांचा महत्त्वाचा वाटा होता. (Sachin Ahir)




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर