मुंबई : (Kaljayi Shriguruji Special Issue) साप्ताहिक विवेकद्वारा प्रकाशित 'कालजयी श्रीगुरुजी' विशेषांकाचा प्रकाशन सोहळा गुरुवार, दि. २ जुलै रोजी सकाळी १० वाजता वडाळा येथील निको हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परळ विभागाचे विभाग संघचालक रवींद्र संघवी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे देखील उपस्थित राहणार आहेत.(Kaljayi Shriguruji Special Issue)
यावेळी विश्राम बापट लिखित ‘संघ शाखेची गोष्ट’ या पुस्तिकेचे आणि १०१ प्रचारकांची माहिती सांगणारे ‘समिधा’ या हिंदी ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. श्रीगुरुजींचे विचारधन आजच्या काळातही कसे उपयुक्त आहेत, हे आपल्याला या विशेषांकातून वाचायला मिळेल.(Kaljayi Shriguruji Special Issue)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक