मुंबई : (Special Intensive Revision of Electoral Rolls) मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेच्या अनुषंगाने भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने एस. आय. आर. विषयातील महाराष्ट्राचे केंद्रीय प्रभारी आमदार भगवानदास सबनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
मतदार यादीचे शुद्धीकरण हे सशक्त लोकशाहीचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाने एस. आय. आर. मोहिमेत सहभागी होऊन हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी बैठकीत करण्यात केले.(Special Intensive Revision of Electoral Rolls)
याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, रवी भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते.(Special Intensive Revision of Electoral Rolls)