मॉडेलिंग आणि ‘कॅम्पस बीट्स’नंतर समर खळतकरचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!

    07-Nov-2026

samar
 
 
 
 मुंबई - Maitreya Samar Khalatkar Kranti Redkarमनोरंजनविश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी केवळ देखणं व्यक्तिमत्त्व पुरेसं नसतं, तर त्याला अभिनयाची जोड आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्दही लागते. मॉडेलिंगच्या दुनियेतून आपल्या प्रवासाला सुरुवात करणारा समर खळतकर आता अभिनयाच्या क्षेत्रात नवी झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. फॅशन आणि लाईफस्टाईल ब्रँडसाठी मॉडेलिंग केल्यानंतर त्याने अभिनयाकडे मोर्चा वळवला. लोकप्रिय युवा वेबसीरिज ‘कॅम्पस बीट्स’च्या पाचव्या सीझनमधील सहभागामुळे त्याला हिंदी मनोरंजनविश्वात ओळख मिळाली. आता याच अनुभवाची शिदोरी घेऊन तो क्रांती रेडकर वानखेडे दिग्दर्शित ‘मैत्रेया’ या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
मॉडेलिंगमधून मिळालेला कॅमेऱ्यासमोरचा आत्मविश्वास, ‘कॅम्पस बीट्स’मधून मिळालेला अभिनयाचा अनुभव आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा अशा टप्प्यांतून समरचा हा प्रवास घडला आहे. हिंदी मनोरंजनविश्वातील तरुणाईच्या कथांनंतर आता मराठी चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘मैत्रेया’मधील त्याची भूमिका मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या भावविश्वाशी जोडलेली असून त्याचा सहज वावर आणि आकर्षक स्क्रीन प्रेझेन्स या भूमिकेला नवा रंग देणार आहे. अभिनयासोबतच समरचं नृत्यसकौशल्यही अप्रतिम आहे. नृत्याची आवड आणि त्यातील कौशल्य यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झळाळी लाभली आहे. त्यामुळे समरच्या या मराठी पदार्पणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.Maitreya Samar Khalatkar Kranti Redkar
समर म्हणतो, “कलाकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मला ‘मैत्रेया’सारखा चित्रपट मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयाचे विविध पैलू अनुभवता आले आणि माझ्या भूमिकेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहाता आलं. क्रांती मॅम यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. ‘मैत्रेया’मधील माझं काम प्रेक्षकांना आवडेल आणि त्यांच्या मनात माझ्यासाठी एक खास जागा निर्माण होईल, अशी आशा आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याची माझी इच्छा आहे.”Maitreya Samar Khalatkar Kranti Redkar
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे यांनी ‘मैत्रेया’मधून मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या आयुष्यात उमलणाऱ्या नात्यांची गोष्ट मांडली आहे. समरसोबत आयुषी, स्काय आणि रुची हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत. येत्या २० नोव्हेंबरला ‘मैत्रेया’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. मॉडेलिंगपासून वेबविश्व आणि आता मराठी सिनेमापर्यंतचा समरचा हा प्रवास प्रेक्षकांच्या पसंतीस किती उतरतो, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.Maitreya Samar Khalatkar Kranti Redkar
 




संबंधित मजकूर