माधुरी दीक्षितसोबत 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर रंगणार दिवाळीची धम्माल; सोनाली कुलकर्णी, रविना टंडन आणि फराह खान यांची खास उपस्थिती!

    07-Nov-2026

kbc
 
 
 मुंबई - Madhuri Dixit Sony Marathiदिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, नाती आणि भरपूर धमाल! यंदा हाच उत्साह 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरही अनुभवायला मिळणार आहे. होस्ट माधुरी दीक्षितच्या साथीनं यंदाची दिवाळी अधिक खास करण्यासाठी मनोरंजन विश्वातील तीन लोकप्रिय चेहरे सहभागी होणार आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, रविना टंडन आणि प्रसिद्ध दिग्दर्शिका, नृत्यदिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत दिवाळीचे तीन विशेष भाग रंगणार असून, प्रेक्षकांना मनोरंजनाची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
हे दिवाळी विशेष भाग शनिवारी ७ नोव्हेंबरपासून येणार असून सुरुवात सोनाली कुलकर्णीच्या खास भागानं होणार आहे. सोनालीच्या गप्पांमधून तिचं मराठी मातीशी असलेलं नातं, मराठी संस्कृतीवरील प्रेम आणि तिच्या खास आठवणी उलगडणार आहेत. याच भागात माधुरी दीक्षितनं डेन्व्हरमध्ये आपल्या कुटुंबासोबत साजऱ्या केलेल्या दिवाळीच्या आठवणीही सांगितल्या आहेत. या दोघींच्या मराठमोळ्या अंदाजाला आणखी खास बनवणारा क्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषेत त्यांनी 'आली माझ्या घरी ही दिवाळी' या खास दिवाळी गाण्यावर केलेला धमाकेदार डान्स. यासोबतच या मराठमोळ्या अभिनेत्रींनी मंचावर घातलेल्या फुगड्या आणि झिम्मा याने यामध्ये एक वेगळीच रंगत आणली आहेच मात्र, त्याला जोड म्हणून लाभलेली ढोल-ताशांची साथ यामुळे कोण होणार करोडपतीच्या मंचावरची ही दिवाळी अवर्णनीय झाली आहे.Madhuri Dixit Sony Marathi
यानंतर सोमवारी ९ नोव्हेंबरचा दिवाळी विशेष भाग रंगणार आहे रविना टंडनसोबत. रविना आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. खाद्यपदार्थांवरील तिचं प्रेम, खाण्यापिण्याच्या आवडी आणि कुटुंबातील मजेशीर किस्से यांमुळे गप्पांना रंग चढणार आहे. विशेष म्हणजे, लग्नाच्या विषयावर बाबांनी केलेल्या एका मजेशीर टिप्पणीचा किस्साही रविना सांगणार आहे.Madhuri Dixit Sony Marathi
यानंतर १० नोव्हेंबरचा म्हणजे पाडव्याचा विशेष भाग रंगणार आहे फराह खानसोबत. चित्रपट क्षेत्रातील चटपटीत आठवणी, देश विदेशातील कोरिओग्राफी, आणि खाण्याच्या पदार्थांच्या खुमासदार चर्चा या भागात रंगणार आहेत. हा विशेष भाग चित्रपटातील नायक नायिकांच्या कोरिओग्राफीतील गमतीशीरअनुभवांचा असेल तसेच भाजणीच्या चकलीसारख्या खमंग तारे तारकांविषयीच्या गप्पांचा देखील असेल.Madhuri Dixit Sony Marathi
हास्याचे फटाके आणि ठसकेदार मनोरंजक किस्से आणि चित्रपटविश्वातील गप्पांची रंगत या दिवाळी विशेष भागात तीन वेगवेगळ्या दिग्गज कलाकारांसोबत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या तीन वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या तीन खास भेटी, माधुरी दीक्षितसोबत रंगणाऱ्या मनमोकळ्या गप्पा, जुन्या आठवणी, मराठमोळा साज आणि धमाकेदार नृत्य अशा मनोरंजनानं भरलेल्या या दिवाळी विशेष भागांमुळे 'कोण होणार करोडपती'चा मंच यंदा अक्षरशः उजळून निघणार आहे.Madhuri Dixit Sony Marathi
 




संबंधित मजकूर