लडाखमध्ये भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; १३ हजार फूट उंचीवर अवजड मालवाहू विमानाचे यशस्वी लँडिंग!

    07-Nov-2026   
 
 
IAF IL-76MD landing in Ladakh
 
मुंबई (IAF IL-76MD landing in Ladakh) : रशियामध्ये निर्मित भारतीय हवाई दलाचे एक मालवाहू विमान लडाखमधील न्योमा हवाई तळावर यशस्वीरीत्या उतरले. हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, या विमानाने जगभरात आतापर्यंतची सर्वाधिक उंचीवरील लँडिंग करण्याचा विक्रम नोंदवला आहे. न्योमा हवाई तळ समुद्रसपाटीपासून सुमारे १३ हजार ६२९ फूट उंचीवर आहे. चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून हा तळ सुमारे २५ किलोमीटर अंतरावर आहे. 'भारतीय हवाई दलाच्या आयएल-७६एमडी विमानाने न्योमा येथे यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला आहे. या विमानाने जगभरात आतापर्यंतची सर्वाधिक उंचीवरील लँडिंग केली आहे.’ (IAF IL-76MD landing in Ladakh)
 
हवाई दलाने आपल्या सोशल मिडियावरील पोस्ट मध्ये म्हटले की, विमानाच्या उत्कृष्ट क्षमतेचे हे शानदार प्रदर्शन आहे. यामध्ये विमानाच्या वैमानिकांसह संपूर्ण पथकाचे असाधारण कौशल्य, अचूकता आणि व्यावसायिक दृष्टिकोन दिसून आला आहे. भारताच्या सामरिक हवाई वाहतूक क्षमतेला अधिक बळकटी देणारी ही लँडिंग एक महत्त्वपूर्ण कामगिरी असल्याचेही हवाई दलाने नमूद केले. (IAF IL-76MD landing in Ladakh)
 
आयएल-७६एमडी हे चार इंजिन असलेले विशाल आकाराचे (वाइड बॉडी) सामरिक अवजड मालवाहू विमान आहे. याची निर्मिती मूळतः सोव्हिएत संघात करण्यात आली होती. हे विमान ४० ते ५० टनांपर्यंत माल वाहून नेण्यास सक्षम आहे. यामधून रणगाडे, तोफा, चिलखती वाहने तसेच संपूर्ण क्षेत्रीय रुग्णालयही वाहून नेता येऊ शकते. बारकाईने किंवा नाजूक कामगिरी करण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक करण्याच्या क्षमतेला प्राधान्य देऊन या विमानाची रचना करण्यात आली आहे. (IAF IL-76MD landing in Ladakh)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर