भारतीय महाकाव्याचा जागतिक पडद्यावर डंका! 'रामायणम'ची बॉक्स ऑफिसावर बंपर ओपनिंग !

    05-Nov-2026

ramayan
 
 
 मुंबई (विशेष प्रतिनिधी ) - Ranbir Kapoor Yash Sai Pallaviभारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या रामायणाची भव्य कथा आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. अभिनेता रणबीर कपूर याची प्रमुख भूमिका असलेला आणि नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘रामायण : भाग १’ हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून भारतीय पौराणिक कथेची आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भव्य सिनेमॅटिक मांडणी करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली असून प्रेक्षकांना चित्रपट आवडतोय. पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात अंदाजे 60 कोटींचा गल्ला जमवला आहे.
या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय सनी देओल हनुमानाच्या, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. अरुण गोविल, लारा दत्ता आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.Ranbir Kapoor Yash Sai Pallavi
‘रामायण’ हा केवळ पौराणिक चित्रपट न राहता जागतिक दर्जाचा सिनेमॅटिक अनुभव देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सची जबाबदारी ऑस्करविजेती कंपनी DNEG ने सांभाळली आहे. ए. आर. रहमान आणि हान्स झिमर यांनी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.
Ranbir Kapoor Yash Sai Pallavi
लंकेचे साम्राज्य, अयोध्येचे वैभव, वनवासातील प्रसंग, युद्धभूमी आणि विविध पौराणिक व्यक्तिरेखांचे विश्व मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपट IMAX आणि इतर प्रीमियम फॉरमॅटमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. सकाळी 6 पासून चित्रपटाचे शो ठेवण्यात आले असून लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चित्रपट आवडतो आहे. दिवाळीची मोठी सुट्टी, 20 नोव्हेंबर पर्यंत दुसरा कुठला मोठा सिनेमा रिलीज होणार नसल्यामुळे हा चित्रपट कमाईचे कोणते नवे कीर्तिमान प्रस्थापित करतो हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.Ranbir Kapoor Yash Sai Pallavi
 




संबंधित मजकूर