जीवन विमा हा आर्थिक नियोजनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा तुमच्या बाबतीत एखादी अनपेक्षित घटना घडते, तेव्हा तुमच्या कुटूंबातील प्रियजनांचे संरक्षण करण्यासाठी हवे असलेले आर्थिक स्वातंत्र्य जीवन विमाच प्रदान करतो. तरीही संपूर्ण भारतात विमारुपी स्वातंत्र्य अजूनही बहुतांश लोकांच्या आवाक्याबाहेर आहे.
भारत ही जगातील सहावी सवार्धिक मोठी अर्थव्यवस्था आहे आणि वेगाने वाढणाऱ्या विमा बाजारपेठांपैकी भारत ही जगातील एक प्रमुख बाजारपेठ ठरली आहे. २०२६ पर्यंत भारतीय विमा बाजारपेठेचा आकार २२२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. तरीही, या प्रभावी वाढीच्या मार्गात अद्यापही अडथळा दिसत आहे. जीवन विम्याचे प्रमाण आर्थिक वर्ष २०२३ मधील ३ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २.८ टक्क्यांवर आणि आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आणखी घसरून २.७ टक्क्यांवर आले आहे. हे आकडे जागतिक सरासरीच्या सात टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहेत. भारताची लोकसंख्या अवाढव्य असून बहुतांश भारतीय विमा कवचाविना जगत आहे. त्यांना विम्याचे पुरेसे संरक्षण नाही, हे सध्याचे वास्तव यातून स्पष्टपणे दिसून येते. (Insurtech in India)
ग्रामीण भारताचे उदाहरण विचारात घेऊ या . ग्रामीण भारताला आपण अनेकदा 'भारत' म्हणतो. इन्शुरन्स ब्रोकर्स असोसिएशन ऑफ इंडिया (IBAI) च्या अहवालानुसार, देशाची जवळपास ६५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि त्यापैकी १० टक्क्यांहून कमी लोकांकडे जीवन विमा संरक्षण कवच आहे. विमा अधिक सुलभ बनवणे आणि समाजाच्या मोठ्या घटकापर्यंत आर्थिक सुरक्षा पोहोचवणे, हे अजुनही एक मोठे आव्हान आहे, परंतु त्याचबरोबर विम्याच्या विस्तारासाठी भारतात अमाप संधी आहेत, या दोन बाबी या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येतात. विमा संरक्षणातील दरी भरून काढण्यासाठी केवळ पारंपारिक वितरण मॉडेलपेक्षा तातडीने वेगळे पावले उचलण्याची गरज आहे; यासाठी नाविन्यपूर्ण पर्यायांची गरज आहे. हे पर्याय जागरूकता, परवडण्याची क्षमता आणि विमा योजना ग्राहकांना सहज उपलब्ध होणे, यामधील अडथळे दूर करू शकतील. (Insurtech in India)
विमा क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आणि तो लोकांपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी इन्शुरटेक म्हणजेच विमा तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतात विम्याचा प्रसार कमी असलेल्या भागांमध्ये किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. विमा कंपन्यांच्या कामात वेग आणि अचूकता आणण्यासाठी अल्गोरिदम (गणितीय नियम) आणि एपीआय (वेगवेगळ्या सॉफ्टवेअरना जोडणारे तंत्रज्ञान) यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे ग्राहकांना विमा योजना नीट समजून घेणे, तो ऑनलाइन किंवा सहजतेने खरेदी करणे आणि पॉलिसी घेतल्यानंतर मिळणाऱ्या सेवा अत्यंत सोप्या व पारदर्शक पद्धतीने मिळणे शक्य होत आहे. (Insurtech in India)
तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि जीवन विम्याशिवाय कोणतेही आर्थिक नियोजन पूर्ण होत नाही. जेव्हा तुमच्या बाबतीत एखादी अनपेक्षित घटना घडते, तेव्हा तुमच्या कुटूंबातील प्रियजनांचे संरक्षण करण्याचे आवश्यक असलेले आर्थिक स्वातंत्र्य जीवन विमाच प्रदान करतो. (Insurtech in India)
एआय आणि तंत्रज्ञानाची ताकद
आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि तंत्रज्ञानाच्या बळावर, 'भारतभर' म्हणजेच मेट्रो किंवा मोठ्या शहरांप्रमाणेच आता देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी जीवन विमा सुलभपणे उपलब्ध करून देण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी विमा पॉलिसी खरेदी करताना प्रस्ताव अर्ज भरावा लागत असे. त्यानंतर तो अर्ज बँकेच्या शाखांमधून विभागीय कार्यालयांपर्यंत आणि पडताळणीसाठी अनेक टप्प्यांतून जावा लागायचा आणि यामध्ये मानवी चुका होण्याची शक्यता खूप जास्त असायची आणि वेळही खूप जायचा. आता एआयमुळे ही सगळी किचकट प्रक्रिया अत्यंत सोपी, वेगवान आणि विना-अडथळा झाली आहे. या तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना कोणत्याही लांबलचक प्रक्रियेशिवाय खूप कमी वेळात आणि सहजरित्या विमा संरक्षण मिळणे शक्य झाले आहे. (Insurtech in India)
एआयने ग्राहक सेवा अधिक कार्यक्षम बनवली आहे. ग्राहकांना कमी प्रीमियम आकारत मोठ्या संख्येतील ग्राहकवर्गाला सेवा देणाऱ्या जीवन विमा कंपनीचा जरूर विचार करा . अशा कंपन्यांसाठी त्यांची अंतर्गत यंत्रणा (बॅकएंड) म्हणजेच डेटा व्यवस्थापन, कागदपत्रे तपासणे आणि ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची पध्दत अत्यंत वेगवान आणि अचूक असणे आवश्यक असते.
ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे मदत करण्यासाठी एआय आणि तंत्रज्ञान विमा कंपन्यांना अनेक सुविधा आणि मार्ग पुरवते. प्रथम म्हणजे, चॅटबॉट्स चोवीस तास उपलब्ध असल्यामुळे व्यक्ती त्यांच्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतात. (Insurtech in India)
दुसरे म्हणजे, एआयच्या मदतीने पॉलिसीचे नूतनीकरण अधिक कार्यक्षमतेने केले जाऊ शकते. आजकाल, पॉलिसीचा हप्ता (प्रीमियम) भरण्यासाठी ग्राहकांना सतत फोन करणे नेहमीच फायदेशीर ठरत नाही. बऱ्याचदा ग्राहकांना वारंवार आलेले कॉल्स आवडत नाहीत, तर काहींना आठवण करून दिलेली चालते. प्रत्येक ग्राहकाची आवड वेगळी असल्यामुळे कोणत्या ग्राहकाशी कशा पद्धतीने संपर्क साधायचा, हे ठरवणे गरजेचे असते. या समस्येवर मात करण्यासाठी, एआयमधील अॅ्नालिटिक्सचा वापर करून कंपन्या ज्यांना कॉल किंवा मेसेज करणे योग्य ठरेल, अशा ग्राहकांच्या गटांना अचूक ओळखतात. मानवी हस्तक्षेपाविना, एआय व्हॉइस बॉट्स स्वतः ग्राहकांना फोन करतात आणि त्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने पेमेंट प्रक्रिया पूर्ण करायला मदत करतात. तिसरे म्हणजे, एआय पारंपारिक मानवी प्रक्रियेच्या तुलनेत सरळ आणि सोप्या दाव्यांची पूर्तता अतिशय वेगाने करतात. (Insurtech in India)
एआयमुळे विमा मंजुरीची प्रक्रिया (अंडररायटिंग) सोपे झाले आहे
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे विमा मंजुरीची अत्यंत किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया अतिशय वेगवान, अचूक आणि सुरक्षित झाली आहे. विमा पॉलिसी मंजूर करताना ग्राहकांच्या आरोग्याची कागदपत्रे, आर्थिक स्थिती, त्याला असलेला धोका आणि कागदपत्रांमध्ये कोणती फसवणूक आहे का, हे सगळे तपासावे लागते आणि पूर्वी ही प्रक्रिया खूप किचकट होती. एआय अशा प्रकारचा प्रचंड आणि गुंतागूंतीचा डेटा काही सेकंदांत समजून घेतो आणि विमा कंपनीला वेगाने निर्णय घेण्यासाठी मदत करतो. प्रत्येक ग्राहकाचे स्वरुप आणि गरज वेगळी असते. एआय प्रत्येक ग्राहकाचा अभ्यास करून त्याच्यासाठी योग्य अशी 'रिस्क प्रोफाईल' तयार करतो आणि त्यामुळे धोका ओळखण्याची अचूकता वाढते. पूर्वी एखादी पॉलिसी मंजूर होऊन हातात यायला दिवस किंवा आठवडे लागायचे. पण आता एआयमुळे ही प्रक्रिया काही तास किंवा मिनिटांत पूर्ण होते. अर्जातील माहितीमध्ये काही विसंगती असेल किंवा सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये काही फसवणूक असेल, तर एआय ती लगेच ओळखू शकतो. (Insurtech in India)
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आजकाल मोबाईल ॲप्स केवळ माहिती दाखवणारी साधने राहिली नसून, ती अत्यंत स्मार्ट आणि बुद्धिवान बनली आहेत. विमा एजंट किंवा ग्राहकांसाठी असणारे एखादे ॲप दिसायला खूप साधे किंवा सोपे वाटू शकते, पण त्याच्या पडद्यामागे एआयचे शक्तिशाली तंत्रज्ञान काम करत असते. ग्राहकाची पार्श्वभूमी तपासून त्याला किती धोका आहे, याचे अचूक मूल्यांकन हे ॲप करते. ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला कोणती विमा पॉलिसी सर्वात योग्य ठरेल, याची शिफारस हे ॲप करू शकते. ग्राहकाच्या जुन्या डेटाच्या आधारावर फॉर्ममधील माहिती ॲप स्वतःहून आधीच भरून घेत असल्यामुळे वेळ वाचतो. एखादा ग्राहक भविष्यात हप्ता भरणे थांबवेल किंवा त्याची पॉलिसी बंद होईल, हे एआय आधीच ओळखून एजंटला सतर्क करू शकते. (Insurtech in India)
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागात जीवन विमा सहज पोहोचवणे आणि वितरित करणे शक्य झाले आहे. देशातील अनेक ग्रामीण व निमशहरी भागांमधील कुटुंबांकडे स्थिर उत्पन्न आणि मुलभूत सुविधा असूनही, बऱ्याचदा अशा भागात विमा कंपन्यांच्या भौतिक शाखा किंवा वैयक्तिक वित्तीय सल्लागार नसतात. (Insurtech in India)
जीवन विम्याचे 'लोकशाहीकरण' करण्याचा खरा अर्थ केवळ अधिकाधिक लोकांपर्यंत विमा पोहोचवणे एवढाच नाही, तर आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या आणि स्वप्ने बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आणि कष्टांचा सन्मान करणे, हा आहे. कारण प्रत्येकास अशा प्रकारच्या मानसिक शांततेचा अधिकार आहे. जेव्हा प्रत्येकाला सुरक्षित वाटण्याची संधी मिळते, तेव्हाच खरी प्रगती होते. (Insurtech in India)
-कास्परस जॅकोबस हेंड्रिक क्रोमहौट - व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीराम लाईफ इन्शुरन्स