घाटकोपरमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरण तापले; आरोपीविरोधात लुकआऊट नोटीसची मागणी

धर्मांध जिहादी जैद कुरेशीला भारतात आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचे प्रयत्न

    03-Nov-2026   

Ghatkopar Case
 
मुंबई (Ghatkopar Case) : घाटकोपर येथील २१ वर्षीय हिंदू तरुणीची फसवणूक करून तिचे लैंगिक शोषण, शारीरिक छळ आणि खासगी छायाचित्रे व व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी २३ वर्षीय जैद (झैद) कुरेशी या जिहाद्याविरोधात घाटकोपर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीच्या आईने या प्रकरणात माजी भाजप खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेऊन मुलीवर होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली होती. त्यानंतर सोमय्या यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला. तसेच आरोपीला भारतात परत आणून अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
 
सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि मिळालेल्या एफआयआरनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८ च्या सुमारास या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. जून २०२५ च्या मध्यापासून घाटकोपर पश्चिम परिसरातील असल्फा गाव, अहमदिया मशीद आणि एनएसएस रोड परिसरात हे कथित प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारीनुसार, धर्मांध मुस्लिम कुरेशी याने महाराष्ट्रातील हिंदू तरुणीशी मैत्री केली. तिच्याशी विवाह करण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या काळात तिचे खासगी छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रित केले. त्यानंतर तिचा शारीरिक छळ करण्यात आला. सिगारेटचे चटके देणे आणि मारहाण करणे असे प्रकारही केल्याचा आरोप आहे. तसेच खासगी छायाचित्रे आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.(Ghatkopar Case)
 
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६९, कलम ११५(२), कलम ३५१(२), कलम ३५२ आणि कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी आणि तिच्या आईची भेट घेतल्यानंतर आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. या प्रकरणातील ब्लॅकमेलिंगचा गंभीर प्रकार आणि आरोपीचे दुबईला पलायन याकडेही त्यांनी लक्ष वेधले. १ नोव्हेंबर रोजी भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी घाटकोपर पश्चिम पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली. आरोपीविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करावे आणि त्याला तपास व कायदेशीर कारवाईसाठी भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यासंदर्भात सोमय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुंबई पोलिसांकडेही पाठपुरावा केला.
 
घाटकोपरमधील प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. आरोपी दुबईत असल्याची माहिती निश्चित झाल्यास त्याला भारतात परत आणण्यासाठी प्रत्यार्पण किंवा अन्य कायदेशीर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. पीडितेचा सविस्तर जबाब आणि डिजिटल पुराव्यांची न्यायवैद्यक तपासणी यांमधून तपासात पुढील माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.(Ghatkopar Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर