‘स्वबळावर पुढे जायचे असेल तर मोदीजींसोबत जा’! शुभेंदू अधिकारी यांचा दावा; म्हणाले, ‘प्रणव मुखर्जी यांनीच भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता!’

माजी राष्ट्रपतींना आपले मार्गदर्शक आणि पालक मानत असल्याचे अधिकाऱ्यांचे वक्तव्य

    25-Nov-2026
 
Suvendu Adhikari Pranab Mukherjee Statement
 
कोलकाता (Suvendu Adhikari Pranab Mukherjee Statement) : तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीच दिला होता, असा दावा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी केला आहे. कोलकाता येथे मंगळवारी आयोजित ‘इकॉनॉमिक टाइम्स बंगाल असेन्ड्स’ या परिषदेत बोलताना त्यांनी हा खुलासा केला.
 
प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर आपण त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेलो होतो. त्यावेळी आपल्यामध्ये राजकीय भवितव्याबाबत चर्चा झाली. ‘तुम्हाला काय करायचे आहे, याचा विचार करा. कर्मचारी म्हणून राहायचे असेल तर तृणमूल काँग्रेसमध्ये राहा; मात्र स्वतःच्या बळावर पुढे जायचे असेल तर मोदीजींसोबत जा,’ असा सल्ला प्रणव मुखर्जी यांनी दिल्याचे अधिकारी यांनी सांगितले. (Suvendu Adhikari Pranab Mukherjee Statement)
 
तृणमूल काँग्रेस हा ‘बुआ-भतीजे’ म्हणजेच ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांचा पक्ष असल्याचे मतही मुखर्जी यांनी व्यक्त केले होते, असा दावा अधिकारी यांनी केला. पक्षाची रचना खासगी कंपनीप्रमाणे असून, आपण तेथे केवळ कर्मचारी म्हणून राहू इच्छित नव्हतो, त्यामुळे पक्ष सोडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Suvendu Adhikari Pranab Mukherjee Statement)
 
अधिकारी यांनी प्रणव मुखर्जी यांना आपले ‘मूळ मार्गदर्शक’ आणि पालक संबोधले. या भेटीची नेमकी तारीख सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. मुखर्जी आता हयात नसल्याने या विषयावर अधिक बोलल्यास वाद निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
 
प्रणव मुखर्जी यांचे ऑगस्ट २०२० मध्ये निधन झाले. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मुखर्जी यांनी दिलेल्या कथित सल्ल्याबाबतचा त्यांचा हा दावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. (Suvendu Adhikari Pranab Mukherjee Statement)





संबंधित मजकूर