उद्योगपती गौतम अदानी यांची मुंबई पुस्तक महोत्सवाला भेट

    25-Nov-2026   
 
 
Gautam Adani Mumbai Book Festival
 
मुंबई (Gautam Adani Mumbai Book Festival): प्रसिद्ध उद्योगपती तथा अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी बुधवारी, मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६ ला भेट दिली. या महोत्सवात मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
 
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देशपांडे, उद्योगपती मोहित कंबोज-भारतीय, मुंबई पुस्तक महोत्सवाचे आयोजक आ. अमीत साटम, मुंबई पुस्तक महोत्सवचे संयोजक आचार्य पवन त्रिपाठी आणि म्हाडा चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल उपस्थित होते. (Gautam Adani Mumbai Book Festival)
 
गौतम अदानी म्हणाले की, "मुंबई बुक फेस्टिव्हलमधील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानार्जनाला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम हा अभिनव दृष्टिकोन आहे. या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. लहान मुलांसह प्रत्येक नागरिकाने पुस्तकांचा अधिकाधिक वापर करावा, पुस्तकांचे वाचन करावे आणि त्यातून नवनवीन गोष्टी शिकून घ्याव्यात. प्रत्येक नागरिकाने या पुस्तकांमधून शिकून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे," असे आवाहन त्यांनी केले.  (Gautam Adani Mumbai Book Festival)
 
'चिल्ड्रन्स कॉर्नर'ला भेट
 
यावेळी गौतम अदानी यांनी महोत्सवातील विविध दालनांची पाहणी केली. तसेच लहान मुलांसाठी उभारण्यात आलेल्या 'चिल्ड्रन्स कॉर्नर'ला भेट देऊन तेथील उपक्रमांचीही माहिती घेतली. (Gautam Adani Mumbai Book Festival)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर