हिंदुस्थानात बांग्लादेशी, रोहिंग्यांची दादागिरी चालणार नाही -मंत्री मंगलप्रभात लोढा

कुर्ला घटनेवर संतप्त प्रतिक्रिया!

    23-Nov-2026   
 
 
Mangal Prabhat Lodha Kurla Statement
 
मुंबई (Mangal Prabhat Lodha Kurla Statement): कुर्ल्यातील घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत नसून त्यात धार्मिक रंग आहे. जर कुणी मुस्लिम एखाद्या व्यक्तीला केवळ तो हिंदू आहे म्हणून मारत असेल तर ते चुकीचे आहे. हा हिंदुस्थान आहे. इथे बांग्लादेशी, रोहिग्यांची दादागिरी चालणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. 
 
कुर्ला पश्चिम येथील फिनिक्स मार्केटसिटी मॉलजवळील प्रमोद महाजन उद्यानात एका तरुण आणि तरुणीला मुस्लिम अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली. यावर मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "मार खाऊन गप्प बसायचे का? कुणीही रोहिंग्या, बांग्लादेशी इथे येऊन दादागिरी करतील, ते चालणार का? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. इथे बॉम्बस्फोटातील आरोपीला माफी द्यावी म्हणून राष्ट्रपतींना पत्र लिहिणाऱ्या अमीन पटेल यांचे सरकार नाही. कुर्ल्यातील घटनेबाबत हिंदुत्ववादी संघटना मोर्चा काढत आहे. पुन्हा अशी घटना घडल्यास मुंबईचे लोक त्यांच्या अंगावर धावून जातील." (Mangal Prabhat Lodha Kurla Statement)
 
मतदारसंघ पुर्नरचना विधेयकाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, "राऊत हेसुद्धा खासदार आहेत. त्यांनी १५० कोटी नाही तर, दीड कोटी तरी घेऊन दाखवावे आणि मग बोलावे. केवळ राजकारणात विध्वंस निर्माण करणे एवढेच त्यांचे काम आहे. जे काम कम्युनिस्ट, आतंकवादी आणि नक्षलवाद्यांनी केले तेच काम संजय राऊत आणि त्यांचे साथीदार करत आहेत." (Mangal Prabhat Lodha Kurla Statement)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर