
गोवा (विशेष प्रतिनिधी ): iffi 2026 tighi sonalee kulkarni मराठी चित्रपटसृष्टीतील आशयसमृद्ध चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या प्रयत्नांना ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आणखी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील भावविश्व, नात्यांमधील गुंतागुंत आणि भावनिक बंध उलगडणाऱ्या जिजीविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ या मराठी चित्रपटाचे सोमवारी गोव्यात विशेष प्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनाला देश-विदेशांतील सिनेरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी इफ्फीतील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दालनाला भेट देत सिनेकर्मी आणि माध्यमकर्मींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन करत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली.
गोव्यातील हॉटेल ताज होरायझन येथे इफ्फीअंतर्गत ‘वेव्हज् फिल्म बझार’ विभागात ‘तिघी’चे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने या चित्रपटाला महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर स्थान मिळाले. मराठी चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महामंडळ सन २०१५ पासून इफ्फीमध्ये सहभागी होत आहे. यंदा महामंडळाने ‘सिनेमॅन’ आणि ‘तिघी’ या दोन मराठी चित्रपटांची निवड केली होती.
iffi 2026 tighi sonalee kulkarni
या महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी महामंडळाच्या दालनाला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित कलाकार, चित्रपट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि माध्यमकर्मींशी त्यांनी अनौपचारिक संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांनी महोत्सवासाठी निवड झालेल्या मराठी चित्रपटांतील कलाकारांचा सत्कारही केला. चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, मराठी चित्रपटांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या संधी आणि या क्षेत्राच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी यावेळी दिली.iffi 2026 tighi sonalee kulkarni
‘तिघी’ हा चित्रपट तीन स्त्रियांच्या परस्परांशी जोडलेल्या आयुष्याचा, त्यांच्या नात्यांचा आणि भावनिक संघर्षांचा संवेदनशील वेध घेतो. आई आणि तिच्या दोन मुली यांच्यातील नात्याचे विविध पैलू उलगडताना स्त्रीमनातील भावभावना, अपेक्षा, संघर्ष आणि नात्यांमधील न बोललेले कंगोरे चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत.
iffi 2026 tighi sonalee kulkarni
जिजीविषा काळे दिग्दर्शित या चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपटाच्या आशयाची आणि मराठी चित्रपटांच्या जागतिक स्तरावरील सादरीकरणाची पुन्हा एकदा दखल घेतली गेली. या प्रदर्शनावेळी दिग्दर्शिका जिजीविषा काळे, निर्माते सुहृद गोडबोले आणि निखिल महाजन उपस्थित होते. त्यांनीही उपस्थित सिनेरसिकांशी संवाद साधत चित्रपटाच्या निर्मितीविषयी आणि त्यामागील संकल्पनेविषयी आपले अनुभव मांडले.
iffi 2026 tighi sonalee kulkarni