मातृत्वाची चाहूल लागली की संबंधितांना सांगितले जाते, हल्लीच्या मुली नाजूक आहेत, पौष्टिक खाणे कुठे खातात? कष्टाची कामेच करत नाहीत. त्यामुळे कळा येऊन, नैसर्गिकरीत्या बाळ जन्मणे कठीणच. ‘सिझेरियन’ करावी लागेल. दुसरीकडे मागील पिढीच्या स्त्रिया म्हणतात, ‘आमच्या वेळी नव्हते हो, हे ‘सिझेरियन’ का काय? आम्ही तर आपले आपणच बाळंत झालो.’ यावर असे दिसते की, अनेकदा गरज नसतानाही केवळ पैसे उकळण्यासाठी ‘सिझेरियन’ शस्त्रक्रिया केली जाते. याच पार्श्वभूमवीर राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये होणार्या प्रत्येक ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेचे, त्याच दिवशी परीक्षण करणे बंधनकारक केले आहे. शस्त्रक्रिया करण्यामागचे नेमके वैद्यकीय कारण काय होते, याचा स्पष्ट उल्लेख एका विशेष अर्जात नमूद करायचे निर्देश दिले गेले आहेत. या निर्णयाने गरज नसताना ‘सिझेरियन’ करण्यासाठी लाखो रुपये घेणार्या रुग्णालयांवर, आता वचक बसणार आहे. धन्यवाद, बहिणींचे लाडके देवाभाऊ!
याअनुषंगाने आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीने, सप्टेंबर २०२६ पर्यंतची प्रसूतीसंदर्भातील जाहीर आकडेवारी पाहू. या आकडेवारीनुसार, राज्यातील शहरी भागांत ‘सिझेरियन’चे प्रमाण खूपच अधिक असल्याचे समोर आले आहे. मुंबईत सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या २५ हजार २ प्रसूतींपैकी १२ हजार ६५४ प्रसूती म्हणजे, जवळजवळ ५१ टक्के ‘सिझेरियन’द्वारे झाल्या. खासगी रुग्णालयांमध्ये हेच प्रमाण २४ हजार ७४० प्रसूतींपैकी १४ हजार ६०६ म्हणजे, ५९ टक्के इतके आहे. तर, नवी मुंबईतील सरकारी रुग्णालयांमध्ये ४३ टक्के आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५५ टक्के प्रसूती, शस्त्रक्रियेद्वारेच केल्या गेल्या आहेत. ठाण्यात सरकारी रुग्णालयांचे प्रमाण ३९ टक्के असून, खासगी रुग्णालयांमध्येही ५८ टक्के प्रसूती ‘सिझेरियन’नेच झाल्याची नोंद आहे. ही आकडेवारी पाहून वाटते की, ५० टक्के माता नैसर्गिकरीत्या प्रसूत होऊच शकत नाहीत, हे सत्य कसे असेल? तसेच ‘सिझेरियन’ शस्त्रक्रिया करावी लागली म्हणून, कर्जाचे डोंगर डोक्यावर चढलेली अनेक कुटुंबे आज आहेत. ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेसाठी पैसे लागतील म्हणून, ‘हम दो हमारा एक’ किंवा ‘हमारे शून्य’ दाम्पत्यांची संख्याही वाढती आहे. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयाने या सगळ्यांनाच चाप बसणार आहे, धन्यवाद, बहिणींचे लाडके देवाभाऊ!
ते तर असे पछाडलेले!
य बाय सांगू, कसं गं सांगू?’ अशी प्रेमाची भावना व्यक्त करणारे एक गीत आहे. अगदी तशाच; पण प्रेमाच्या नव्हेत, तर द्वेषाच्या भावना पुण्यात अमित शाह येऊन गेले म्हणून, उबाठांच्या मनात उमटल्या आहेत. आजही सत्ता गेल्याचे भयंकर दुःख, वैषम्य या साहेबांना आहे. ‘मी म्हणजेच मराठी माणूस’, ‘मी म्हणजेच महाराष्ट्र’ अशी कल्पना यांच्या मनात कोरली गेली आहे. पण, कोरलेल्या मनातून मराठी भाषा आणि मराठी माणूस कधीच ‘टाटा-बायबाय’ करून निघून गेला (असेही लोकच म्हणतात.) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात येऊन अजितदादांच्या स्मृतींना वंदन केले, हे यांना आवडलेले नाही. उद्दाम भाषेत त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांची निंदा केली, टोमणेही मारले. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, ‘जे ज्याला ‘बेस्ट’ जमेल, ती व्यक्ती तेच करणार!’ उद्धव ठाकरेसाहेब एकापेक्षा एक सरस टोमणे मारू शकतात, त्यामुळे त्यांनी टोमणेच मारले.
त्यांच्या पित्यांविषयी समस्त महाराष्ट्राला आदर आहे. मात्र, या परिप्रेक्ष्यात उबाठा यांच्याबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित होत राहतात. त्यांनी काँग्रेसचे समर्थन करणे असू दे की, ‘कम्युनिस्टां’ना सोबत घेणे असू दे, ‘उर्दू भवन’ बांधण्याचा घाट असू दे की, त्यांना त्यांचे नवमतदार ‘जनाब उद्धवसाहब’ म्हणणे असू दे, सगळ्यावरच काही लोक प्रश्न उपस्थित करतात. का कोण जाणे, यावरही कवी बोरकरांच्या कवितेची आठवण झाली. ते म्हणायचे, ‘मी तर बाबा पछाडलेला!’ कवी नीतिमूल्ये, सत्याच्या ध्यासाने पछाडलेले; तर उबाठा ‘फेसबुक लाईव्ह’ करून कधीकाळी आपण ‘बेस्ट सीएम’ होतो, या विचाराने पछाडलेले! काय म्हणता, यावर ‘छोटुकली’ होईल? (छोटे नाटक म्हणजे, ‘नाटुकली’ तसे छोटी स्वैर कविता म्हणजे, ‘छोटुकली’ का म्हणू नये? शब्दांचे खेळ काय केवळ उबाठांनाच येतात का?) तर कवी बोरकरांची क्षमा मागून ‘छोटुकली’ अशी आहे -
मीच सर्वोत्तम मुख्यमंत्री होऊन गेलो,
सांगत बसतात सदासर्वकाळ,
ते तर असे पछाडलेले!
मोदी, शाह आणि देवेंद्रला पाहून मनात एकच ध्यास,
सत्ता गेली आता सूड... सूड, ते तर असे पछाडलेले!