मुंबई - Kaviya Maran Anirudh Ravichander'व्हाय धिस कोलावेरी डी' या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळवलेले दाक्षिणात्य संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन आणि सनरायझर्स हैदराबादच्या मालक काव्या मारन यांनी लग्न केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत लग्नाची पहिली झलक शेअर केली. या जोडप्याने ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये विवाह केला, यावेळी त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय उपस्थित होते. या विशेष प्रसंगाला रजनीकांत यांनीही हजेरी लावली होती.
अनिरुद्धने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्स X आणि इंस्टाग्रामवर लग्नाची एक सुंदर झलक पोस्ट केली आहे. त्याचे कॅप्शन फोटोपेक्षाही अधिक सुंदर आहे.सोशल मीडियावर फोटो शेअर करत अनिरुद्धने लिहिले आहे, 'आयुष्यात एकदा, आयुष्यभरासाठी प्रेम ११.११', ज्यासोबत त्याने लाल रंगाच्या हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.अनिरुद्धने काव्या मारनसोबतचे काही अप्रकाशित फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते दोघे रोमँटिक दिसत आहेत. त्याने या फोटोंना हार्ट इमोजीसह कॅप्शन दिले आहे.Kaviya Maran Anirudh Ravichander
या लग्नाच्या फोटोमध्ये अनिरुद्ध क्रीम रंगाच्या पारंपरिक पोशाखात दिसत आहे. त्याने कुर्त्यासोबत जुळणारी वेष्टी आणि एक सुंदर भरतकाम केलेले लांब जॅकेट घातले आहे काव्या मारन सुंदर पीच रंगाच्या लेहेंग्यामध्ये खूपच मोहक दिसत होती. फोटोंमध्ये दोघीही खूपच सुंदर दिसत आहेत.अनिरुद्ध आणि काव्याचा विवाहसोहळा १० आणि ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये पार पडला. या सोहळ्याला दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावली होती.Kaviya Maran Anirudh Ravichander