
मुंबई (कपिल देशपांडे ) -Digambar Naik Drought दुष्काळाची झळ आता शहरांपर्यंत पोहोचू लागली असली, तरी ग्रामीण भागातील शेतकरी आणि बळीराजाला त्याची सर्वाधिक झळ सोसावी लागत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मराठी रंगभूमीवरील कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. ‘केला तुका नि झाला माका’ या नाटकाच्या विशेष प्रयोगाचे आयोजन सोमवारी शिवाजी नाट्य मंदिरात करण्यात आले होते. या प्रयोगातून मिळणारी संपूर्ण मिळकत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय निर्मात्या नीलम शिर्के-सामंत आणि नाटकाच्या संपूर्ण टीमने घेतला आहे. या उपक्रमात निर्मात्या नीलम शिर्के-सामंत यांच्यासह अभिनेते पंढरीनाथ कांबळे, दिगंबर नाईक आणि इतर सहकलाकार सहभागी झाले आहेत.
या उपक्रमाविषयी बोलताना दिगंबर नाईक यांनी 'मुंबई तरुण भारत' सोबत संवाद साधताना सांगितले की, मराठी कलाकार हा स्वभावतः भावनाप्रधान असतो. अनेक कलाकारांनी प्रतिकूल परिस्थितीतून आपला प्रवास सुरू केला असल्याने समाजातील सर्वसामान्य माणसांच्या अडचणींची त्यांना जाणीव आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने हातभार लावला, तर त्यातून मोठी मदत उभी राहू शकते.Digambar Naik Drought
‘आमच्या परीने मदत करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येकाने अशा प्रकारे पुढाकार घेतला, तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नक्कीच आधार मिळेल,’ अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली..Digambar Naik Drought
केवळ मनोरंजन न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून मराठी रंगभूमीने दिला आहे.Digambar Naik Drought